Nashik News : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी नोंदणीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ६८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २७ हजार ७६० जागा उपलब्ध असून, मंगळवारी (ता.११) सायंकाळपर्यंत २१ हजार ३४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना येत्या शनिवार (ता.१५) पर्यंत नोंदणी करून अर्जाचा भाग एक भरण्याची मुदत असणार आहे. (21 thousand students aspirants for 11th admission)
शिक्षण विभागातर्फे राज्यातील प्रमुख महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे अकरावीला प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाते आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीच्या या प्रक्रियेत सध्या नोंदणीची व अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आत्तापर्यंतच्या प्रक्रियेला विद्यार्थी व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या २१ हजारापेक्षा अधिक झालेली आहे.
अर्ज प्रक्रियेत अर्जाचा भाग एक आणि भाग दोन असे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. यापैकी अर्जाचा भाग एकमध्ये वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. तर भाग दोनमध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखेसाठी पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. यामध्ये अर्जाचा भाग एक भरण्यासाठी शनिवारी (ता.१५) दुपारी चारपर्यंत मुदत दिलेली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांना नोंदणी करून अर्ज प्रमाणित करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. (latest marathi news)
अकरावी प्रवेश पहिल्या फेरीचे वेळापत्रक असे :
- अर्जाचा भाग १ भरण्याची मुदत- १५ जून सायंकाळी ४ पर्यंत.
- भाग २ भरलेल्या व पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्धी, भाग २ अर्ज लॉक करणे- १८ ते २१ जून
- पहिल्या निवड यादीची ऑनलाइन पद्धतीने प्रसिद्धी- २६ जून
- महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत- २९ जूनपर्यंत
पुढील फेऱ्यांचे नियोजन असे :
* दुसरी नियमित फेरी- २ ते ८ जुलै
* तिसरी नियमित फेरी- ९ ते १८ जुलै
* विशेष प्रवेश फेरी- १९ ते २६ जुलै
नाशिक शहरातील आकडेवारी अशी-
- अकरावी प्रवेशासाठी नोंदणीकृत विद्यार्थी- २१ हजार ३४७
- प्रवेश फेरीसाठी उपलब्ध जागा- २२ हजार ९२३
- कोट्यांतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध जागा- ४ हजार ८३७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.