onion sakal 123.jpg 
नाशिक

SAKAL Exclusive : राज्यातील 13 हजार कांदा उत्पादकांचे 24 कोटी रखडले; आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अनुदान देण्याची मागणी

SAKAL Exclusive : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून राज्य सरकारने प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून राज्य सरकारने प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, दीड वर्षानंतरही राज्यातील १२ हजार ९४७ शेतकऱ्यांच्या खात्यात ठणठणाट असून, त्यांचे २४ कोटी ७७ लाख ३३ हजार रुपयांचे अनुदान रखडले आहे. विधानसभा आचारसंहितेपूर्वी तरी या शेतकऱ्यांना अनुदान मिळेल का, असा प्रश्‍न शेतकरी संघटनांनी उपस्थित केला आहे. (24 crore stalled by 13 thousand onion producers in state demanding subsidy before code of conduct )

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार दररोज नवनवीन योजनांची घोषणा करत आहे. कर्मचाऱ्यांच्या मानधनातही भरघोस वाढ केली. एकीकडे घोषणांचा पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला याच सरकारने दीड वर्षापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान योजना २०२२-२३ लागू करत उत्पादकांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. यात १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे.

एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोनशे क्विंटलपर्यंत हे अनुदान देण्याचे राज्य सरकारने निश्चित केले. योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे सातबारा उताऱ्यावर ‘उन्हाळ कांदा नोंद’ या सबबीखाली काही शेतकऱ्यांना तालुकास्तरीय समितीने अपात्र ठरविले त्यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत फेरतपासणी करून अर्ज पात्र ठरविले आहेत. पात्र शेतकऱ्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

महिन्यापूर्वीच पत्र

राज्यातील पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी पुणे येथील पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांच्या स्वाक्षरीने सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला. या प्रक्रियेला महिना पूर्ण होऊनही अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली दिसत नाही. उपसचिवांना २६ ऑगस्ट २०२४ ला पत्र मिळूनही शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. (latest marathi news)

''राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांना आचारसंहितेपूर्वी लाभ दिला पाहिजे. शेतकऱ्यांचे सरकार म्हणून महायुतीचे सरकार काम करत असेल तर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित का ठेवले जात आहे?''-भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना

जिल्हानिहाय पात्र शेतकरी

जिल्हा....बाजार समिती...खासगी ...एकूण....रक्कम

नाशिक....९,६४२..... ३४६.......९,९८८.....१८ कोटी ५८ लाख ७८ हजार रुपये

धाराशिव...२७२..........००........२७२.....एक कोटी २० लाख ९८ हजार रुपये

पुणे ग्रामीण......२७७....... …..००........२७७....७८ लाख २४ हजार रुपये

सांगली.... २१................००.......२१.. ७ लाख ५० हजार रुपये

सातारा.....१,१५९.........००........१,१५९...२ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपये

धुळे.......४३..............००..........४३....५ लाख ७१ हजार रुपये

जळगाव....३८७..........००.........३८७...एक कोटी ६४ लाख ७ हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT