The horse market in Yevala was crowded with handsome horses and buyers for sale on Tuesday esakal
नाशिक

Nashik News : येवल्याच्या बाजारात 248 घोड्यांची विक्री! पांढरा मारवाड अडीच तर घोडी दीड लाखांना, देशभरातून शौकीन दाखल

Latest Nashik News : आजच्या बाजारात अडीच लाखांना सफेद मारवाड तर दीड लाखांची सफेद घोडीची विक्री आज झाली. दिवसभरात सुमारे सहा लाखापर्यंत येथील बाजारात घोडा खरेदी झाल्याचे सांगण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

येवला : देखणा अन मनमोहक लुक, ठेका धरून नृत्य करणारे, उंच अन धिप्पाड...रंगाने लालभडक अन पांढरे शुभ्र...असे देशभरातून आलेले हजारो देखणेबाज घोड्यांनी मंगळवारी (ता.८) येथील लोकप्रिय घोडेबाजार फुलून गेला. घोडे खरेदी-विक्रीसाठी पंजाब, राजस्थानसह देशभरातील व्यापारी व शौकिनांची मोठी गर्दी झाली होती.

आजच्या बाजारात अडीच लाखांना सफेद मारवाड तर दीड लाखांची सफेद घोडीची विक्री आज झाली. दिवसभरात सुमारे सहा लाखापर्यंत येथील बाजारात घोडा खरेदी झाल्याचे सांगण्यात आले. (248 horses sold in yeola market)

येथील घोडेबाजाराला ऐतिहासिक वारसा असून सुमारे ४०० वर्षांपूर्वी शहराचे संस्थापक राजे रघुजीबाबा शिंदे यांनी शहर बसवल्यानंतर या घोडेबाजाराला सुरवात केली होती. तेव्हापासून दसऱ्याच्या आदल्या मंगळवारी हा विशेष बाजार भरतो. यंदाच्या बाजारात देशभरातून विक्रेते आणि खरेदीदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. देशभरातून सुमारे ७०० वर घोडे विक्रीसाठी आले होते. येवल्यात बाजार समितीत प्रत्येक मंगळवारी घोडेबाजार भरतो, मात्र दसऱ्याच्या आधीच्या मंगळवारच्या बाजाराला देशभरातून विक्रेते आलेले असतात.

मंगळवारी घोडेबाजारामध्ये पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश व देशाच्या कानाकोपऱ्यातून घोड्याचे व्यापारी व खरेदीदार आले होते. पंजाब, मारवाड, शिरपूर, काठेवाड, सिंधी, गावरान आदी जातींचे व देवमन, पंचकल्याण, चार पाय सफेद, अबलक, मुकरा अशा अनेक गुणांचे घोडे बाजारात आलेले होते. पंधरा हजारांपासून ते तीन चार लाखापर्यंतच्या घोडे विक्रीला आले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे यांनी दिली. (latest marathi news)

सफेद नुकरा अडीच लाखांत

सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासह अनेक नामवंतांनी येथील बाजारातून घोडे खरेदी केलेले आहेत. आजच्या बाजारात इगतपुरीच्या मारवाड जातीच्या सफेद नुकरा घोड्याची शहरातील अरुण गांगुर्डे यांनी खरेदी केली. साडे तीन लाखांची बोली विक्रेत्याने लावली होती, मात्र गांगुर्डे यांनी अडीच लाखात हा सफेद घोडा खरेदी केला. संभाजीनगर येथील सौरभ पुरकर यांच्या श्यामकर्ण जय मंगल सफेद घोडी १ लाख ५१ हजारांना विक्री झाली. आंबेगाव तालुक्यातील बिलोरी येथील सरफारान अख्तर यांनी ही घोडी खरेदी केली.

"दसऱ्याच्या आधीचा भरणारा येथील घोडेबाजार राज्यासह देशात प्रसिद्ध आहे. शहराच्या स्थापनेपासून येथे घोडे बाजार भरतो. राजे रघुजीबाबा शिंदे या पूर्वजांनी सुरू केलेल्या या बाजाराचे महत्त्व व आकर्षण वाढत आहे. आज देशभरातून व्यापारी आले होते. ७०० च्या आसपास घोडे विक्रीला आले होते."- सविता पवार, सभापती, बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT