Shravan 2024 : श्रावण महिन्याला सुरवात होत असताना पहिल्याच दिवशी सोमवार येत असल्याने भाविकांची शिवमंदिरांमध्ये गर्दी होणार आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला दर वर्षी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत दर्शन घेत असतात. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्या उपलब्ध असणार आहेत. शहरातील नवीन सीबीएस बसस्थानकावरून महिन्याच्या दर सोमवारी पंचवीस जादा बसगाड्या त्र्यंबकेश्वरसाठी सोडल्या जाणार आहेत. (25 additional buses from New CBS to Trimbakeshwar for devotees )
श्रावण महिन्यातील पहिला सोमवार उद्या (ता. ५) येत असून, यानिमित्त शिवमंदिरे सजली आहेत. ऐरवी वर्षभर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची वर्दळ असते. परंतु श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, देशभरातून भाविक मंदिरात दर्शनासाठी दाखल होत असतात. बहुतांश वेळा प्रवासी रेल्वे, रस्ते मार्गाने नाशिकपर्यंतचा प्रवास करतात व पुढे बसने त्र्यंबकेश्वर गाठत असतात. (latest marathi news)
या भाविकांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाने श्रावण महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या व पाचव्या सोमवारी जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक तसेच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी येणाऱ्या भाविकांना या जादा बसगाड्यांमुळे प्रवास सुलभ होणार आहे. महामंडळाच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार ५, १२, २६ ऑगस्ट तसेच २ सप्टेंबर या दिवशी त्र्यंबकेश्वरसाठी एकूण ३३ जादा बस सोडल्या जाणार आहेत.
...असे आहे महामंडळाचे नियोजन
शहरातील नवीन सीबीएस बसस्थानकावरून २५ जादा बसगाड्या उपलब्ध असतील. तसेच इगतपुरी येथून म्हसुर्ली, वैतरणामार्गे त्र्यंबकेश्वरसाठी पाच बसगाड्या, तर पेठ येथून अंबोलीमार्गे त्र्यंबकेश्वरसाठी तीन अशा एकूण ३३ जादा बसगाड्या भाविकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.