Students Survey sakal
नाशिक

Student Survey : शाळेशी कधीही संबंध न आलेले 26 मुले आढळले! महापालिकेकडून सर्वेक्षण, शाळाबाह्य मुलांना तातडीने प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने मागील वीस दिवसात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये २६ मुले अशी आढळली की त्यांचा शिक्षणाशी कधीही संबंध आला नाही. त्यामुळे अशा शाळाबाह्य मुलांना तातडीने ते वास्तव्य करीत असलेल्या शाळांमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Student Survey)

पाच ते वीस जुलै या दरम्यान महापालिकेच्यावतीने शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याचा उद्देश होता. शाळाबाह्य त्याचप्रमाणे अनियमित स्थलांतरित बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात दाखल करून घेण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली होती.

महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये तीन ते १४ वयोगटातील २६ मुले आढळून आले. विशेष म्हणजे यातील एकही मुलगा व मुलगी यांचा शाळेशी कधीही संबंध आलेला नसल्याची बाब समोर आली.

त्यामुळे तातडीने शाळाबाह्य असलेल्या १६ बालकांना सिडकोतील श्रीमती सरस्वती गुलाबराव पाटील प्राथमिक शाळेत प्रवेश देण्यात आला तर सहा मुलांना महापालिकेच्या शाळा क्रमांक ८९ व चार मुलांना शाळा क्रमांक ८० मध्ये प्रवेश देण्यात आला. (latest marathi news)

शहरातील झोपडपट्ट्या तसेच रस्त्याच्या बाजूला पाल ठोकून राहणाऱ्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले सिग्नल बाजार समिती आवार व आठवडे बाजारात देखील सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी बी टी पाटील यांनी दिली.

"शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी महापालिकेच्या वतीने शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी महापालिकेच्या वतीने शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला त्यात २६ मुले सापडले त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात आले आहेत." - बी टी पाटील, शिक्षणाधिकारी, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT