नांदगाव : येथे आयोजित लोक अदालतीत २९४ प्रकरणांचा निपटारा करुन ५९ लाख ६७ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली. शनिवारी (ता. २७) झालेल्या लोक न्यायालयात आपापसातील वादविवाद, विविध शासकीय आस्थापनांच्या विवादित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यात बँक वसुली, वीजवितरण कौटुंबिक प्रकरणे, धनादेश वटविणे आदी विविध बाबींशी निगडित केसेसवर सामोपचारातून प्रकरणे निकाली काढण्यात आली. (Nashik 294 cases peoples court disposed in Nandgaon)
सर्वाधिक प्रकरणे बँकेशी निगडित १८ केसेसमध्ये तडजोड होऊन २४ लाख ३४ हजार रुपये, तर धनादेशप्रकरणी २९ हजार ९०० रुपये वसूल झाले. पॅनलप्रमुख म्हणून नांदगावचे न्यायाधीश जे. एम. अग्निहोत्री व पॅनल सदस्य म्हणून ॲड. सुशील जाधव यांनी काम बघितले.
नांदगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. उमेशकुमार सरोदे-पाटील, सचिव ॲड. शेखर पाटील व ॲड. सौरभ कासलीवाल यांच्यासह न्यायालयाचे कर्मचारी, अधीक्षक पगारे, लिपिक पी. डी. पाटील, एम. सी. पांढरे, एस. बी. चव्हाण, डी. के. शिंदे, किरण वाघ यांनी लोकन्यायालय यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. (latest marathi news)
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयकुमार कासलीवाल, ॲड. युनूस शेख, ॲड. बी. आर. चौधरी. ॲड. आर. एस. दराडे, ॲड. दिगंबर आहेर, ॲड. पंकज साळुंखे, ॲड. लक्ष्मण सुरसे, ॲड. प्रमोद दौंड, ॲड. पी. एम. घुगे, ॲड. व्ही. पी. आहेर, ॲड. ए. के. शिंदे, ॲड. एस. जे. घुगे, ॲड. जी. एस. सुरसे, ॲड. बाळकृष्ण बिन्नर, ॲड. सचिन साळवे, ॲड. रंजन आहेर, ॲड. सुमंत पाटील, ॲड. भरत जाधव, ॲड. महेश पाटील, ॲड. रंजन आहेर, ॲड. किरण गायकवाड, ॲड. एफ. सी. सोनवणे, ॲड. अक्षय कासलीवाल, ॲड. महाले, ॲड. कुणाल आहेर, ॲड. मनीषा त्रिभुवन, ॲड. मनीषा पाटील, ॲड. वंदना पाटील, ॲड. सनोबर पठाण यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.