smart voting card esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : स्मार्ट मतदान कार्ड पावणेतीन लाख मतदारांकडे

Lok Sabha Constituency : मतदानासाठी वापरात येणाऱ्या पारंपरिक मतदान कार्डला निवडणूक आयोगाने इलेक्शन फोटो आयडेंटीटी कार्डचा (इपीक) ‘स्मार्ट’ पर्याय शोधला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मतदानासाठी वापरात येणाऱ्या पारंपरिक मतदान कार्डला निवडणूक आयोगाने इलेक्शन फोटो आयडेंटीटी कार्डचा (इपीक) ‘स्मार्ट’ पर्याय शोधला आहे. नवमतदारासंह मतदान कार्डात बदल सुचवलेल्या जिल्ह्यातील पावणेतीन लाख मतदारांना इपीक स्मार्ट कार्ड वितरित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावणेतीन लाख स्मार्ट मतदार आहेत, असेही आपण म्हणू शकतो. (3 lakh voters to get smart voting card)

जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दोन लाख ५६ हजार स्मार्ट कार्ड वितरित केली. त्यानंतर नवमतदार असतील किंवा ज्या मतदारांनी नावात, पत्त्यात बदल केला असेल, त्यांनाही स्मार्ट कार्ड दिले. लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्याचे मतदान सोमवारी (ता. २०) होत असून, त्यादृष्टीने १७ हजार मतदारांना अंतिम टप्प्यातील स्मार्ट कार्डचे वाटप केले.

जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील ४६ हजार ६६४ युवा मतदारांची एक जानेवारी २०२४ पर्यंत नोंदणी करण्यात आली. तसेच २० ते २१ या वयोगटातील ७७ हजार ७१ मतदारांची नोंदणी करून त्यांना स्मार्ट कार्ड वितरित केले. मतदान पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात, आपल्या नावात दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म क्रमांक आठ भरून एकूण ३५ हजार ३९२ मतदारांनी दुरुस्ती करुन घेतली.

२०२३ मध्ये हा आकडा ८५ हजार १७५ इतका होता. त्यामुळे दोन वर्षांत एक लाख २० हजारांवर मतदारांनी आपल्या नावात, पत्त्यात दुरुस्ती केली. निवडणूक आयोगाने त्यांनाही स्मार्ट कार्ड वितरित केले. पहिल्या टप्प्यातील दोन लाख ५६ हजार आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर १७ हजार मतदारांना स्मार्ट कार्ड दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पावणेतीन लाखांवर मतदारांकडे स्मार्ट कार्ड असल्याची नोंद जिल्हा निवडणूक विभागाकडे झाली आहे.

"‘इपीक’चा वापर करून मतदारांना मतदान यादीतील नाव शोधणे अगदी सोपे झाले आहे. हे स्मार्ट कार्ड मतदारांना सांभाळणे सोपेही जाते. याशिवाय त्याची गुणवत्ता उत्तम असल्यामुळे ते खराबही होत नाही." - डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी (latest marathi news)

अंतिम टप्प्यातील तालुकानिहाय स्मार्ट कार्ड

नांदगाव-८४५

मालेगाव मध्य-३६९

मालेगाव बाह्य-१२६०

बागलाण-९८४

कळवण-४२३

चांदवड- ६७४

येवला- ९२०

सिन्नर- ५७८

निफाड-९३९

दिंडोरी- ६३२

नाशिक पूर्व-२२५४

नाशिक मध्य-१०८९

नाशिक पश्‍चिम-४०४१

देवळाली-९३३

इगतपुरी-११३७

एकूण-१७ हजार ७८

स्मार्ट कार्डची वैशिष्ट्ये

- इपीक अर्थात, स्मार्ट कार्ड रंगीत स्वरूपाचे

- त्यावरील क्रमांक हा अद्वितीय शिवाय बारकोडही

- फोटोची गुणवत्ता चांगली असल्यामुळे ओळख पटणे सहज शक्य

- इपीक कार्ड पीडीएफ स्वरूपातही उपलब्ध

- डाउनलोड करून घेण्याची सुविधा

- इपीकसाठी ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात अर्ज करण्याची सुविधा

-कागदपत्र बाळगण्याचा त्रास कमी

- मतदारांना त्यांचे नाव https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर तपासणे शक्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT