नाशिक : राज्यातील ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये प्रशासकीय कामकाजाला गती येणे अपेक्षित असताना गती येणे तर दूर उलट नागरिकांच्या तक्रारींचा सुद्धा निपटारा होत नसल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेत विविध विभागांच्या ३०१६ तक्रारी प्रलंबित असल्याने प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. (nashik 3 thousand complaints pending in NMC marathi news)
पाणी, रस्ते, आरोग्य, प्राथमिक शिक्षण व दिवाबत्ती या महत्त्वाच्या सेवा पुरविणाऱ्या महापालिकेत तक्रारींचा ओघ असतो. या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. बदलत्या काळात लेखी तक्रारीने ऐवजी ऑनलाइन तक्रारीसाठी महापालिकेने ॲप उपलब्ध करून दिले आहे.
या ॲपवर प्राप्त झालेल्या तक्रारी स्वयंचलित पद्धतीने महापालिकेच्या ४९ विभागाकडे आपोआप वर्ग होतात. तक्रारीचे निराकरण करण्यासाठी आठ दिवसांची मुदत आहे. आठ दिवसात तक्रारीचा निपटारा न झाल्यास संबंधित विभाग प्रमुखांना स्वयंचलित पद्धतीने नोटीस प्राप्त होते.
त्या अनुषंगाने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वर तक्रारी दाखल होत आहेत. परंतु त्या तक्रारींचे निराकरण झाले तर नागरिकांच्या समस्यांना उत्तर मिळते. मात्र तक्रारी जैसे-थे राहिल्या तर ॲपचा उपयोग नाही. (Latest Marathi News)
अतिक्रमण संदर्भात सर्वाधिक तक्रारी
महापालिकेकडे सध्या तीन हजार सोळा तक्रारी प्रलंबित आहे. या तक्रारींमध्ये अतिक्रमण विभागाशी संबंधित अधिक तक्रारींचा समावेश आहे. नगरसेवक नसल्याने प्रशासनावर वचक राहिलेला नाही. तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नगरसेवक महापालिकेच्या हेलपाटे मारतात. परंतु अधिकारी वर्गाकडून दाद मिळत नाही. प्रशासकीय राजवटीत अधिकारी वर्ग मुजोर झाल्याचे दिसून येत आहे.
विभागनिहाय तक्रारी
अतिक्रमण ८९३, सार्वजनिक बांधकाम ३७७, जन्म-मृत्यू विभाग ३४३, घनकचरा व्यवस्थापन विभाग ३३२, नगररचना २५०, पशुसंवर्धन १६४, पाणीपुरवठा वितरण १४२, उद्यान १२२, मलनिस्सारण ११०, अग्निशमन व आपत्ती निवारण ४७, विद्युत ४१, झोपडपट्टी सुधारणा ४०, पावसाळी गटार योजना २९, क्रीडा २५, पेस्ट कंट्रोल १८, पाणीपट्टी १८, घरपट्टी १३, वैद्यकीय १०, मिळकत ९, पाणीपुरवठा यांत्रिकी ६, एलबीटी ६, जाहिरात ५, जाहिरात परवाना ५, संगणक ५, वाहन विभाग २, तर, दिव्यांग कल्याण, कामगार कल्याण, महिला व बालकल्याण, शिक्षण विभाग प्रत्येकी एक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.