Nashik Dengue Update esakal
नाशिक

Nashik Dengue Update: 3 हजार घरांमध्ये डेंगीच्या अळ्यांचे अड्डे! तपासणीत प्रकार उघडकीस, 515 नागरिकांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dengue Update : डेंगी निर्मूलनासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागाची शासन यंत्रणा म्हणून जबाबदारी असली तरी त्यापेक्षा अधिक डेंगीच्या अळी घरात व घराबाहेरील परिसरात होवू न देण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. परंतु शहरात नागरिकच बेफिकीर असल्याचे आढळून आले आहे. वैद्यकीय विभागाने शासनाला अहवाल सादर केला.

त्यात १७५ वैद्यकीय पथकाच्या पाहणीत ३०५० घरांमध्ये डेंगीच्या अळ्या आढळल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे तीन हजार घरांमध्ये डेंगीच्या अळ्या आढळल्या तरी फक्त ५१५ नागरिकांनाच नोटीस बजावण्यात आल्या असून, सर्वच नागरिकांवर कारवाई का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. (3 thousand houses harbor dengue larvae)

शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असल्याची बाब केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानेदेखील गांभिर्याने घेतली. त्यामुळे केंद्र सरकारचे पथक नुकतेच नाशिकमध्ये आले. पथकाने मलेरिया विभागाला विशेष सूचना दिल्यानंतर १७५ पथकांची निर्मिती करून जनजागृती करण्याबरोबरच अळीची उत्पत्ती साधने शोधणे व नायनाट करण्याचे काम करण्याची जबाबदारी देण्यात आली.

जुलै महिन्यात २ लाख ४ हजार ८९१ घरांना भेटी दिल्या. त्यात ३०५० घरांमध्ये डेंगी अळ्या आढळून आल्या. डेंगी अळी निर्मितीला प्रोत्साहन दिल्याने ५१५ नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या. अशी माहिती राज्य शासनाला पाठविलेल्या अहवालात नमुद करण्यात आली आहे.

आकड्यांचा खेळ, वाढता प्रादुर्भाव

वैद्यकीय विभागाकडून जुलैत केवळ ३११ डेंगी रुग्ण आढळून आल्याची आकडेवारी माध्यमांसमोर दिली गेली. परंतु शासनाला दिलेल्या अहवालात जुलैत ४३४ डेंगी बाधित असल्याचे नमुद करण्यात आले आहे. जुलै महिन्यातील डेंगी बाधितांची आकडेवारी विक्रमी आहे. जून महिन्यात १५५ रुग्ण होते. जानेवारी ते जुलैअखेर एकूण डेंगी बाधितांचा आकडा ६९९ वर पोचला आहे. (latest marathi news)

डेंगी निर्मुलन विशेष मोहिमेत महत्त्वाचे

- १५ ते ३१ जुलै विशेष मोहीम.

- डास प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी १७५ पथक.

- पथकाने २ लाख ८११ घरांना दिल्या भेटी.

- ८ लाख २२ हजार २६८ नागरिकांचे सर्वेक्षण.

- ३०५० घरांमध्ये डास उत्पत्तीची स्थाने.

- २६६५ कन्टेनर्स मधील पाणी दूषित.

- १ लाख २६ हजार ६०० रुपये दंड.

- ५१५ नागरीकांना नोटिसा.

- सहा विभागात १२ ट्रॅक्टरमार्फत कीटकनाशक औषध फवारणी.

- सहाही विभागात ६ मोठ्या मशिन व ३१ छोट्या मशिन धूर फवारणी

- मनपाचे ३७ कायमस्वरूपी, तर २५८ पेस्ट कंट्रोलचे कंत्राटी कर्मचारी.

"खासगी रुग्णालयांचे आकडे गृहीत धरल्याने जुलै महिन्यात डेंगीबाधितांचा आकडा वाढला आहे. मात्र आता रुग्णांची संख्या कमी होत आहे."

- डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक,महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT