tribal development department esakal
नाशिक

Nashik Tribal Development : आदिवासी आश्रमशाळांतील वह्या खरेदीचा मार्ग खुला

Nashik News : आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या ३० कोटींच्या वह्या खरेदीचा मार्ग खुला झाला असून, आदिवासी विकास आयुक्तालयाने वह्या खरेदीचे कार्यारंभ आदेश पात्र पुरवठादारास दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ व २०२५-२६ या दोन शैक्षक्षिक वर्षांसाठी वह्या, लेखन साहित्य व प्रयोगशाळा साहित्य खरेदी करण्याच्या ४२.५४ कोटींच्या निविदा प्रक्रिया ही तक्रार अन् आचारसंहितेच्या कचाट्यात सापडल्याने यंदा शैक्षणिक वर्षात वेळेवर वह्या मिळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित होत होती. (30 crores of purchase of books for students in Tribal ashram schools)

मात्र, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या ३० कोटींच्या वह्या खरेदीचा मार्ग खुला झाला असून, आदिवासी विकास आयुक्तालयाने वह्या खरेदीचे कार्यारंभ आदेश पात्र पुरवठादारास दिला आहे. त्यामुळे १५ जूनला शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या उपलब्ध होणार आहेत. आदिवासी विकास विभागाने गेल्या वर्षी राज्यातील ४९८ आश्रमशाळांमधील पहिली ते बारावीच्या एक लाख ९९ हजार ३७२ विद्यार्थ्यांना गणवेश, पेटी, बूट, नाइट ड्रेस, वह्या.

लेखनसाहित्य आदींसाठी ‘डीबीटी’द्वारे रक्कम देण्याऐवजी साहित्य खरेदी करून ते विद्यार्थ्यांना पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये २०२४-२५ व २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्य असे शालेय साहित्य पुरवण्यासाठी दोन निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्या विरोधात तक्रारी झाल्याने त्या रद्द करत फेब्रुवारी २०२४ मध्ये नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

त्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, प्रात्यक्षिक वह्या आदींसाठी ३० कोटी रुपयांचे व पेन्सिल, खोडरबर, पेन, पॅड, कंपासपेटी आदींचे किट पुरवण्यासाठी १२.५४ कोटी रुपयांची स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केली. या निविदेसाठी फेब्रुवारीत झालेल्या प्रीबीड बैठकीत पुरवठादारांनी या निविदेमधील अटी-शर्तींना विरोध दर्शवत, निविदेतील अटी-शर्ती विरोधात तक्रारी केल्या होत्या. मात्र, आदिवासी विकास विभागाने या अटी-शर्तींमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. (latest marathi news)

त्याविरोधात पुरवठादारांनी शासनस्तरावर दाद मागितली. या वादामुळे यंदाही विद्यार्थ्यांना वेळात वह्या मिळतील की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी वह्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वह्या खरेदीच्या निविदेमध्ये सर्वांत कमी दराने देकार भरलेल्या पुरवठादाराला कार्यारंभ आदेश दिले आहेत.

याबाबत शासनस्तरावरून आवश्यक ते सोपस्कर विभागाने पार पाडले आहेत. यात पुरवठादाराने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना वह्या पुरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशासह वह्यादेखील उपलब्ध होणार आहेत.

लेखन साहित्याची मात्र प्रतीक्षा

आदिवासी विकास विभागाने वह्या खरेदीची निविदा मार्गी लागले असली, तरी लेखन साहित्य व प्रयोगशाळा साहित्य खरेदीची १२.५४ कोटींची निविदा विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे. वह्या खरेदीच्या टेंडरला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधीच वित्तीय सहमती मिळाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर वह्या खरेदीसाठी पुरवठादारास कार्यारंभ आदेश दिले आहेत.

मात्र, लेखन साहित्य व प्रयोगशाळा साहित्य खरेदीला अद्याप मंत्रालयातून वित्तीय सहमती मिळालेली नाही. ही सहमती आचारसंहिता संपल्यानंतर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावर तोडगा म्हणून आदिवासी आयुक्तालयाकडून निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घेण्याची तयारी केली तसा प्रस्ताव शासनाला पाठविला असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT