Summer Fruits esakal
नाशिक

Nashik Summer Fruits Rate Hike: मागणी वाढताच फळांच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ! उन्हाच्या तडाख्यात रसाळ फळांना अधिक मागणी

Nashik News : मागणी वाढल्याबरोबरच त्यांच्या किमतीमध्येही जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. ते शरीरातील पाण्याची गरज भरून काढते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Summer Fruits Rate Hike : उन्हाची प्रखरता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम निघतो. त्यामुळे बॉडी डीहायड्रेट होते. शरीरातील ऊर्जाही कमी होते. थकवा व अशक्तपणा जाणवतो. गमावलेली ऊर्जा पुन्हा प्राप्त करण्यासाठी मोसंबी, कलिंगड (टरबूज), खरबूज, अननस आणि आंबे या मधूर चव असलेल्या रसदार फळांना मागणी वाढली आहे. (Nashik 30 percent hike in summer fruit prices news)

त्यामुळे रसाळ फळांना अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे. मागणी वाढल्याबरोबरच त्यांच्या किमतीमध्येही जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. ते शरीरातील पाण्याची गरज भरून काढते. शरीरातील उष्णता कमी करून शीतलता निर्माण करते.

सोबतच शरीराला ग्लुकोजही गरज भागवते. या सर्व फळांमध्ये विशेष करून कलिंगडास जास्त मागणी आहे. साधारणतः २० ते ३० रुपये प्रतिकिलोने कलिंगड बाजारात उपलब्ध आहे. या कलिंगडामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढते व ऊर्जा निर्माण होते. कलिंगड रसाळ फळांची मागणी वाढल्यामुळे त्यांची आवक ही वाढली आहे. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे महाराष्ट्रातच कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पूर्वी फळ विक्रेत्यांना दारोदारी फिरावे लागत असे. मात्र आता जागेवर व स्टॉल लावूनही चांगल्यापैकी विक्री होते. वाढत्या उष्म्यामुळे पारा ३७ अंशावर गेला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाने शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत रसाळ फळांना मागणी वाढू लागली आहे.

"उन्हाळ्यामध्ये रसाळ फळांना अधिक मागणी असते. सध्या आरोग्याबद्दल अनेक जण जागरूक आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी डाएट करतात. त्यामुळे आहारामध्ये फळांचा समावेश अधिक असतो. लहान मुलेही व महिला ही फळे पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात आहारात घेतात. त्यामुळे फळ विक्रीला सध्या चांगले दिवस आहे."- रिझवान अहमद शहा, फळ विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT