chankapur dam esakal
नाशिक

Nashik News : गाळाने अडविला 300 दशलक्ष घनफूट साठा! चणकापूर धरणातील स्थिती; उपाययोजनेची अपेक्षा

Nashik News : जिल्ह्यात पाझर तलावातून गाळ काढण्यासाठी प्रशासनाने जलसमृध्द नाशिक मोहीम हाती घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : जिल्ह्यात पाझर तलावातून गाळ काढण्यासाठी प्रशासनाने जलसमृध्द नाशिक मोहीम हाती घेतली आहे. यामुळे जिल्ह्यातील १९१ पाझर तलावांमधील जलसाठा वाढण्यास मदत होईल. मालेगावसह कसमादेतील लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना वरदान असलेले चणकापूर धरणात देखील मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. धरणाचा मुळ जलसाठा २ हजार ८२४ वरुन २ हजार ७१४ दशलक्ष घनफूटावर आला. (Nashik 300 million cubic feet of storage blocked by silt Situation in Chankapur Dam)

सध्या साचलेल्या गाळामुळे तो २ हजार ४२४ दशलक्ष घनफुटापर्यंत खाली आला आहे. धरणातील गाळ काढल्यास कसमादेतील शेतीला हक्काचे आणखी एक आवर्तन मिळू शकेल. यासाठी शासन व लोकप्रतिनिधींमध्ये दुर्धम इच्छाशक्तीची आवश्‍यकता आहे.

चणकापूर धरणातून मालेगावसह कसमादेतील विविध पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा केला जातो. ब्रिटीशकाळात धरणाची निर्मिती शेती सिंचनासाठी १९११ मध्ये करण्यात आली होती. त्याकाळी धरण मोठ्या तलावाच्या स्वरुपात होते. सुरुवातीच्या काळात १ हजार ५५० दशलक्ष घनफूट जलसाठा होता.

वाढती लोकसंख्या पाहता धरणाची उंची वाढविण्याची मागणी होत गेली. १९६८ मध्ये उंची वाढविण्याच्या कामाला सुरुवात झाली. १९७३ मध्ये हे काम पूर्ण झाले. त्यावेळी धरणाची साठवण क्षमता २ हजार ८२४ दशलक्ष घनफूट (मृत साठ्यासह) होती. मृतसाठा व गाळ वगळता उपयुक्त जलसाठा २ हजार ७१४ दशलक्ष घनफूट होता.

धरणातील गाळ वाढत गेल्याने सन २०१२-१३ मध्ये सक्षम अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली. यानंतर धरणातील उपयुक्त जलसाठा २ हजार ४२७ दशलक्ष घनफूट निश्‍चित करण्यात आला. सध्या धरणातील बहुतांशी पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. शेतीसाठी जेमतेम एक आवर्तन मिळते.  (latest marathi news)

धरणात जवळपास ३९७ दशलक्ष घनफूट गाळ आहे. शासन, लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतल्यास यातील काही प्रमाणात गाळ काढणे शक्य होणार आहे. गाळ काढल्यास किमान ३०० दशलक्ष घनफूट जलसाठा वाढेल. याचा फायदा निश्‍चितच कसमादेच्या शेतीसाठी होऊ शकेल.

चणकापूर धरणाची निर्मिती : १९११

निर्मितीवेळी साठवण क्षमता : १५५० दशलक्ष घनफूट

धरणाची उंची वाढवली : १९७३

१९७३ मधील एकूण साठवण क्षमता : २८२४ दशलक्ष घनफूट

१९७३ मधील उपयुक्त साठा : २७१४ दशलक्ष घनफूट

२०१३ मधील उपयुक्त साठा : २४२७ दशलक्ष घनफूट

धरणात साचलेला गाळ : ३९७ दशलक्ष घनफूट

"प्रत्येकवेळी उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे धरण व तलावातील गाळ काढण्याचा प्रश्‍न पुढे येतो. उन्हाळा संपताच हा विषय मागे पडतो. सामाजिक संघटनांनी यासाठी पुढे यायला पाहिजे. शासनाने पुढाकार घेऊन धरणातील गाळ काढल्यास जलसाठा वाढेल. सिंचनाचे आवर्तन वाढवून कसमादेतील शेतीला चालना मिळेल."

- डॉ. जयवंतकुमार महाले, सामाजिक कार्यकर्ते, सटाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

Meesho: आता टी-शर्टवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो... मीशोवर नेटकऱ्यांचा संताप! कंपनीनं काय दिलं स्पष्टीकरण?

Kartiki Yatra : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार

अखेर भुलभुलैय्या 3 ने सिंघम अगेनला टाकलं मागे; बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कार्तिकच ठरला अजयपेक्षा सरस

Nashik Vidhan Sabha Election : बंडखोरांच्या तलवारी म्यान; बहुतांश बहुरंगी लढती

SCROLL FOR NEXT