चांदवड : जून महिना म्हटलं की उन्हाळ्याच्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन अन् पावसाच्या आगमनाने बाहेर धरणी मातेवर उगवणारे कोवळे अंकुर. तसंच काहीसं उन्हाळ्यातील सुटीनंतर पुन्हा भरणारी शाळा अन् मुले-पालकांच्याही मनात नवनवीन उपक्रमांना घेऊन सुरू होणाऱ्या शाळेबाबत उत्सुकता आहे. आजही शाळा भरणार म्हणून पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शाळांची डागडुजी करून घेतली. (37 classrooms in Chandwad taluka are waiting for repair)
दोन दिवस अगोदरच शाळांच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी स्वतः शाळांची साफसफाई केली. तालुक्यातील शाळांमधील १७ वर्गखोल्यांची दुरुस्ती झाली असून, अजूनही ३७ वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात २४ नवीन वर्गखोल्यांचे काम सुरू आहे; तर नऊ वर्गखोल्यांसाठी निधी मंजूर असून, लवकरच काम सुरू होणार आहे.
जिथे आवश्यकता भासेल, तिथे नवीन खोल्यांच्या मंजुरीसाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा भार ५६५ शिक्षकांवर असून, ९५ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकाला दोन-दोन वर्ग सांभाळावे लागतात. काही ठिकाणी वस्तीशाळांवर तर एकच शिक्षक पहिली ते चौथीपर्यंत शिकवितात. काही शाळांच्या शैक्षणिक दर्जामुळेच कुठेतरी कमी पडतोय.
तर भोयेगावसारख्या अनेक शाळांतील विद्यार्थी शहरातील कॉन्व्हेन्ट शाळांतील विद्यार्थ्यांनाही मागे टाकत आहेत. शाळा प्रवेशासाठी शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. नवागतांच्या स्वागतासह पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार असून, शालेय पोषण आहारात गोड पदार्थांचा समावेश राहील. (latest marathi news)
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार फक्त उपशिक्षकांच्याच बदल्या होणार आहेत. यासाठी बदलीपात्र शिक्षकांचे अर्ज संकलनाचे काम सुरू आहे.
"चांदवड तालुक्यात एकूण २६९ शाळा असून, त्यापैकी अनुदानित सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच, सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची १२ जून २०२४ ला जेआरजी विद्यालयात बैठक घेऊन वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शाळा प्रवेशोत्सवाची तयारी सर्व शाळांमध्ये १३ जूनपासूनच सुरू आहे. या कामी सर्व विस्तार अधिकारी, शिक्षक व केंद्रप्रमुख स्वतः प्रत्येक शाळेचा आढावा घेऊन पुढील वर्षाचे नियोजन करीत आहेत." - आर. आर. बोडके, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, चांदवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.