milk Producer esakal
नाशिक

Milk Producers : दूध उत्पादकांच्या खात्यावर 37 कोटी 20 लाख; दीड लाख जणांना अनुदानवाटप

Milk Producers : गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी दुग्धविकास विभागाने सुरू केलेल्या योजनेचा राज्यातील एक लाख ५१ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी दुग्धविकास विभागाने सुरू केलेल्या योजनेचा राज्यातील एक लाख ५१ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. त्यांच्या बॅंक खात्यावर ३७ कोटी २० लाखांचे अनुदान आतापर्यंत जमा झाले आहे. विशेष म्हणजे अनुदानाच्या रकमेत दोन रुपयांची वाढ करून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी गोड निर्णय घेतला आहे. राज्यात सहकारी दूध संघ व खासगी प्रकल्पांमार्फत १६० लाख लिटर दुधाचे संकलन होते. (37 crores 20 lakhs people have been distributed subsidy on account of milk producers )

दूध उत्पादकांना १ जुलै २०२४ पासून पाच रुपये प्रतिलिटर अनुदान मिळत आहे. योजनेत राज्यातील १६८ प्रकल्पांमधील एक लाख ५१ हजार ६९३ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. विविध प्रकारच्या चार लाख ९८ हजार ८२१ जनावरांची नोंदही करण्यात आली. त्या माध्यमातून सात कोटी ४५ लाख २८ हजार ३१४ लिटर दुधाचे संकलन झाले. त्यांना अनुदानापोटी सरकारने ३७ कोटी २० लाख ७० हजार ९१५ रुपये थेट बँक खात्यावर वर्ग केले. १ ऑक्टोबरपासून दूध उत्पादकांना सात रुपये प्रतिलिटर याप्रमाणे अनुदान मिळेल. दूध भुकटी उत्पादकांनाही अनुदान वितरित केले जाते.

दोन रुपयांनी वाढ

दुग्धविकास विभागाकडून दूध उत्पादकांच्या अनुदानात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पूर्वी पाच रुपये लिटरप्रमाणे मिळणारे अनुदान १ ऑक्टोबरपासून सात रुपये करण्यात आले आहे. त्यासाठी ८७९ कोटी रुपयांच्या वाढीव निधीला सरकारने गुरुवारी (ता. २६) मंजुरी दिली.

''राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध प्रकल्पांनी या योजनेत सहभागी होऊन अनुदानाचा लाभ घ्यावा. अनुदानात वाढ झाल्याने त्याचाही फायदा शेतकऱ्यांना निश्‍चितपणे होणार आहे.''-प्रशांत मोहोडे, आयुक्त, दुग्धविकास विभाग (महाराष्ट्र राज्य) (latest marathi news)

अनुदानवाटपाची सद्यःस्थिती

जिल्हा..........प्रकल्प.........शेतकरी........दूध (लिटर).----....वितरित अनुदान

अहमदनगर.....४८...........४९,८७५...... ३,४६,२५,९४६....१७,२८,८६,४९०

कोल्हापूर.........३.............४१,६५३......६१,८२,२३५......३,०८,२५,५००

पुणे................३६...........३५,२६७......१,७८,८५,७४९.....८,९३,३२,५९०

सांगली...........१३............४,१३६.......१८,०९,४३७.......९०,३८,१५५

सातारा...........८..............१,४०८......... ९,७९,१७०.........४८,८१,१८०

सोलापूर..........२९............११,१०९.......७३,९२,१८६......३,६९,४६,७५५

नाशिक...........१२.............३,५५५........२६,९०,७५३......१,३३,९५,४६५

धुळे................२..............२४३..........६५,८०२...........३,२६,६६५

नागपूर............१...............३६४..........५८,१११...........२,८९,५२५

भंडारा..............१...............२३२..........६१,८९४...........२,९९,०८०

छत्रपती संभाजीनगर...६..............८५३...........८,३६,१३९.........४१,६८,१०५

बीड.................४...............२,५७४........१६,६९,२५०........८३,२६,१३५

धाराशीव...........५...............४२४...........२,७१,६३७..........१३,५५,२७०

एकूण.......१६८.......१,५१,६९३......७,४५,२८,३१४....३७,२०,७०,९१५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT