Nashik News : जगभराप्रमाणे भारतातही फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढत आहे. आहारातील चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव व प्रामुख्याने स्थूलता यामुळे फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढत असून, भारतात साधारणतः ३७.८ टक्के व्यक्ती फॅटी लिव्हरने ग्रस्त असल्याचे संशोधन अहवालातून समोर आले आहे. (37 percent of people in country are suffering from fatty liver)
संतुलित आहार, नियमित व्यायाम व वजन व्यवस्थापन या त्रिसूत्रीतून व्याधीस दूर ठेवण्याचा सल्ला ‘जागतिक फॅटी लिव्हर डे’निमित्त दिला जात आहे. जागतिक लोकसंख्येच्या सुमारे पंचवीस टक्के लोक ‘फॅटी लिव्हर’ या आजाराने प्रभावित असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. भारतात मात्र हे प्रमाण काहीअंशी अधिक राहात असल्याने वेळीच सतर्क होण्याचा सल्ला जाणकारांकडून दिला जात आहे.
एम्स, दिल्ली यांच्यामार्फत केलेल्या संशोधनात भारतात साधारणतः ३७.८ टक्के नागरिकांना सौम्य ते गंभीर स्वरूपातील ‘फॅटी लिव्हर’ जडलेला आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी १३ जून हा ‘ग्लोबल फॅटी लिव्हर डे’ म्हणून साजरा केला जातो. ‘नियमित तपासणी करा अन् फॅटी लिव्हरबाबत सजग राहा’ या संकल्पनेवर या वर्षी हा दिवस साजरा केला जात आहे.
लक्षणे कळत नाही, पण ‘बीएमआय’ महत्त्वाचा
‘फॅटी लिव्हर’बाबत फारशी प्रचलित लक्षणे नाहीत. पण पोटाच्या उजव्या बाजूच्या भागात वेदना होणे, अशक्तपणा जाणवणे अशी त्रोटक लक्षणे दिसू शकतात. मात्र मॉडी मास इंडेक्स (बीएमआय) च्या माध्यमातून जोखमेचा अंदाज येऊ शकतो. प्रामुख्याने स्थूलता, टाइप-२ मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, चुकीचा आहार, शारीरिक निष्क्रियता यामुळे ‘फॅटी लिव्हर’चा धोका वाढतो. (latest marathi news)
वेळीच धोका ओळखत घ्या औषधोपचार : डॉ. बोहरी
‘फॅटी लिव्हर’डेच्या पार्श्वभूमीवर डॉ. हुसैन बोहरी यांनी बुधवारी (ता. १२) पत्रकार परिषद घेतली. ‘फॅटी लिव्हर’चा धोका वेळीच ओळखत लवकरात लवकरच औषधोपचाराला सुरवात करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ‘फॅटी लिव्हर’मुळे दीर्घकाळ सूज कायम राहिल्यास व व्रण खोलवर गेल्यास ‘लिव्हर सिरोसीस’ होण्याचा धोका असतो.
तसेच यकृताचा कर्करोग होण्याचे प्रमाणही अधिक आहे. ‘फॅटी लिव्हर’ची पार्श्वभूमी असलेल्यांना कर्करोग किंवा हृदयरोगापासून मृत्यूचा धोका अधिक असतो. लक्षणे फारशी दिसत नसल्याने लठ्ठपणा असल्यास किंवा आरोग्यविषयक तक्रार जाणवल्यास तपासणी करून घेणे योग्य ठरते. ‘फायब्रोस्कॅन’ या तपासणीतून यासंदर्भात स्पष्टता येते.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी, उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन व्यवस्थापन, नियमित तपासणी आणि मर्यादित स्वरूपात मद्यपान अशा स्वरूपात ‘फॅटी लिव्हर’चा धोका टाळता येऊ शकतो, असे डॉ. बोहरी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.