37 tanker supply water to drought stricken Sinnar during monsoon esakal
नाशिक

Nashik News : दुष्काळी सिन्नरला पावसाळ्यात 37 टँकरने पाणी; खरीपाच्या धामधुमीत वादळी पावसाचा दणका अन दुष्काळाचा फटका

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : दुष्काळी तालुका अशी बिरुदावली असलेल्या सिन्नरला पावसाळ्यातही पाण्याचे टँकर सुरू आहेत. एका बाजूला तालुक्यात सगळीकडे खरीपाच्या तयारीला वेग आला आहे. तर दुसरीकडे तब्बल ३७ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. हे कमी की काय काही दिवसांपासून सायंकाळी वादळी पाऊस येतो आणि अनेकांचे नुकसान करतो. (37 tanker supply water to drought stricken Sinnar during monsoon)

खरीपाच्या तयारीत व्यस्त शेतकऱ्यांना एकावेळी दुष्काळ टंचाई आणि वादळी तडाखा अशा दुहेरी मार सोसावा लागतो आहे. गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्याने तालुकावासीयांना टंचाईचा सामना करावा लागला. ८ मे २०२३ पासून तालुक्यातील तीन गावे आणि काही वाड्यांवर १० शासकीय टँकरच्या माध्यमातून सुरू झालेला पाणीपुरवठा टँकरच्या वर्षानंतरही तसाच आहे.

३ कोटी टॅकरवर खर्च

तालुक्याच्या पूर्व भागातील चार पाच गावे सोडली तर अद्याप पाऊस झाला नाही. मोजकी चार-पाच गावे वगळता तालुक्यात ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच असून, १२ गावे, २५२ वाड्या तहानलेल्या आहेत. दर आठवड्याला टँकरने पाणीपुरवठ्यावर २१ लाख रुपये खर्च होत सध्या पावसामुळे हा खर्च १६ लाखांवर आला आहे. मार्च २३ पासून टँकरच्या पाण्यावर ३ कोटी खर्ची पडले. यावरुन तालुक्यातील दृष्काळाची कल्पना यावी.

किंचित दिलासा

आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे दणका बसला तसा किंचित दिलासा मिळाला. काही गावात सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींमध्ये पाणी उतरले असून, चार गावे आणि १२ वाड्यांचे टँकर तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. पाऊस झाला नाही, तर या गावांना पुन्हा टँकर सुरू करावे लागण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली. (latest marathi news)

शासकीय टँकरच्या इंधन खर्चापोटी वर्षभरात अंदाजे एक कोटी ७० लाख खर्च झाले आहेत, तर खासगी टँकर गेल्या तीन महिन्यांपासून सुरू झाले असून, त्यावरही तब्बल एक कोटी ३० लाखांचा खर्च झालेला आहे. हा आकडा सर्व मिळून तीन कोटींच्या घरात पोहोचला आहे.

३७ टँकरद्वारे ११२ फेऱ्या

सिन्नर तालुक्यात आतापर्यंत १६ गावे आणि २६४ वाड्यांना दररोज १३१ टँकरच्या फेऱ्यांनी पाणी द्यावे लागत होते. टँकरने दिवसभराचा पाणीपुरवठ्याचा आकडा तब्बल १४ लाख ७० हजार लिटरवर पोहोचला होता. तथापि, जोरदार बेमोसमी पाऊस झाल्याने सार्वजनिक विहिरींमध्ये पाणीसाठा होत आहे. त्यामुळे पांगरी, भरतपूर, रामपूर-पुतळेवाडी, सुरेगाव अशी चार गावे व १२ वाड्यांचे टँकर बंद करण्यात आले असून, पंचायत समितीने सहा टैंकर थांबविले आहेत. सध्या ३७ टँकरद्वारे ११२ फेऱ्या करण्यात येत आहेत.

- ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा

- रोज टॅकरच्या ११२ फेऱ्या

- ४ गावांचे टँकर तात्पुरते बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT