Maharashtra State Rural Jivanonnati Abhiyan esakal
नाशिक

Nashik: महिला बचतगट समूहाच्या खात्यावर 38.23 कोटी निधी वर्ग! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिळतो फिरता निधी

Nashik News : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्य सरकारकडून बचतगटांना दिला जाणारा अतिरिक्त १५ हजार रुपये फिरता निधी बचतगटाच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २८ फेब्रुवारीला यवतमाळ येथे होत असलेल्या महिला बचतगट कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्य सरकारकडून बचतगटांना दिला जाणारा अतिरिक्त १५ हजार रुपये फिरता निधी बचतगटाच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील २५ हजार ४९० बचतगटाच्या (महिला स्वयंसहाय्यता समूह) खात्यावर तब्बल ३८.२३ कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे. या निधीतून बचतगटांना खेळते भांडवल मिळणार आहे. (Nashik Maharashtra State Rural Jivanonnati Abhiyan marathi news)

शासनामार्फत राज्यातील महिला स्वयंसहाय्यता समूहांना अतिरिक्त १५ हजारप्रमाणे फिरता निधी देण्याचे निश्चित केले आहे. सदरील निधी समूहामार्फत अंतर्गत कर्ज देवाण-घेवाणकरिता वापरले जाते. ज्याची परतफेड वेळेत करून गटाचे खेळते भांडवल वाढण्यास मदत होते.

यातून गटातील महिलांच्या लहान लहान गरजा जसे आरोग्य, शिक्षण, घरगुती खर्च अशा स्वरूपाच्या गरजा भागविण्यासाठी केला जातो. या निधीतून काही महिला कोंबडीपालन, किराणा दुकान, शेळीपालन अशा लहान गुंतवणूक असलेल्या रोजगारवृद्धीसाठी देखील निधी वापरतात व वेळेत परतफेड करतात.

यात केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा असतो. एखादा स्वयंसहाय्यता गट स्थापन झाल्यास गटातील सदस्यांना १५ हजार रुपयांची कर्जाची रक्कम मिळत होती. मात्र, गत वर्षी या निधीत वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. सरकारने दुपटीने वाढ करून तो प्रत्येक गटासाठी आता ३० हजार रुपये केला आहे.

त्यामुळे या स्वयंसहायता बचतगटांना आता आणखी प्रोत्साहन मिळणार आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमात बचतगट समूहांना प्रातिनिधिक स्वरूपात या निधीचे वाटप केले जाणार आहे. यादृष्टीने समूहांच्या खात्यावर राज्य शासनाने निधी वर्ग केला आहे.

जिल्ह्यात २५ हजार ४९० महिला बचतगटांचे समूह आहेत. या समूहाच्या बॅंक खात्यावर राज्य शासनाचा प्रत्येक १५ हजारांप्रमाणे निधी वर्ग झाला आहे. राज्य शासनाच्या आदेशान्वये समूहांच्या खात्यावर हा निधी वर्ग केला असल्याचे ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

मार्गदर्शकांचे मानधनही झाले वर्ग

गावागावात मोठ्या प्रमाणात बचतगट तयार होत आहेत. या बचतगटांच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनाशी निगडित एखादा व्यवसाय सुरू करणे, त्याला चांगली बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल, बँकेचे अर्थसहाय्य मिळविणे यांसारखे अनेक गोष्टींसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गावपातळीवर समुदाय संसाधन व्यक्ती कार्यरत आहेत.

त्यांना शासनाकडून यापूर्वी तीन हजारांचे मानधन दिले जात होते. त्यामध्ये देखील वाढ करून ते सहा हजार रुपये करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण दोन हजार ३०३ मार्गदर्शक आहेत. त्यांच्या खात्यावर देखील तीन कोटी ८० लाख ८७ हजार १०० रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे. (Latest Marathi News)

तालुकानिहाय प्राप्त निधी

तालुका समूहसंख्या रक्कम (लाखात)

बागलाण २,३३५ ३५०.२५

चांदवड १,५१८ २२७.७०

देवळा १,०७७ १६१.५५

दिंडोरी १,८०८ २७१.२०

इगतपुरी १,५८६ २३७.९०

कळवण १,५४१ २३१.१५

मालेगाव २,३१९ ३४७.८५

नांदगाव १,२७२ १९०.८०

नाशिक १,५६१ २३४.१५

निफाड २,०८६ ३१२.९०

पेठ १,६६९ २५०.३५

सिन्नर २,१३४ ३२०.१०

सुरगाणा १,६५० २४७.५०

त्र्यंबकेश्वर १,३७६ २०६.४०

येवला १,५५८ २३३.७०

एकूण २५,४९० ३,८२३.५०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: पुण्यात भयंकर प्रकार, भरदिवसा बंदूक नाचवत तरुणांचा राडा; पाहा व्हिडिओ

Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

IND vs NZ: जसप्रीत बुमराहला मुंबई कसोटीतून का बाहेर केलं? BCCI ने सांगितलं खरं कारण

तब्बल ५ वर्षांनी स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका घेणार निरोप; अभिनेत्यानेच पोस्ट करत सांगितलं, म्हणाला- आता लवकरच...

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT