Sewers cleaned in city, Sanitation workers scooping garbage from sewers esakal
नाशिक

Nashik News : मालेगावात 40 टक्के गटारी स्वच्छ; उर्वरित काम 15 दिवसात पूर्ण करणार

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : महापालिका हद्दीत २२ एप्रिलपासून सुरु झालेली विशेष स्वच्छता मोहीम कायम असून आतापर्यंत ४० टक्के गटारींची स्वच्छता करण्यात आली आहे. कडक उन्हामुळे स्वच्छतेचे काम सकाळी साडेपाच ते दुपारी बारा या वेळेत केले जात आहे. भल्या पहाटेपासून स्वच्छता कर्मचारी रस्त्यावरचा केरकचरा उचलत आहेत. (40 percent sewage clean in Malegaon)

या कामासाठी ४५० स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. आणखी पंधरा दिवसात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. गटारींची साफसफाई झाल्यानंतर नाले स्वच्छ केले जाणार आहेत. शहरातील घाण, कचरा व अस्वच्छतेसंदर्भात सातत्याने तक्रारी असतात. त्यांची दखल घेत महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी १८ एप्रिलला सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली.

त्यातील निर्णयानुसार चारही प्रभागांमध्ये २२ एप्रिलपासून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या पंधरा दिवसात शहरातील ४० टक्क्यापेक्षा अधिक गटारींची स्वच्छता करण्यात आली. तुंबलेल्या गटारी वाहत्या करण्यात आल्या आहेत. गटारीतून काढलेली घाण लागलीच ट्रॅक्टरमधून वाहून नेली जात आहे. गटारी वाहत्या झाल्याने डासांचे प्रमाण देखील कमी झाले आहे. (Latest Marathi News)

विविध भागामधील गटारांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यातील काही ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे गटारी खोलवर स्वच्छ होत आहेत. कायमस्वरूपी तुंबणाऱ्या गटारी वाहत्या झाल्याने नागरीकांनी मोहिमेचे स्वागत केले आहे. विशेष स्वच्छता मोहिमेसाठी दोन टप्पे करण्यात आले आहेत. प्रभाग एक व तीन यांचा पहिला तर प्रभाग दोन व चार यांचा दुसरा टप्पा आहे.

"महापालिका हद्दीतील विशेष स्वच्छता मोहीम आणखी काही दिवस सुरु राहील. गटारी स्वच्छतेचे काम पूर्ण झाल्यानंतर नाल्यांची सफाई केली जाईल. स्वच्छता मोहीम यशस्वितेची जबाबदारी कर्मचाऱ्यांबरोबरच अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. शहरवासीयांनी घाण, कचरा गटारात टाकू नये. स्वच्छता मोहिमेसाठी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे."

- रवींद्र जाधव, आयुक्त, मनपा मालेगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT