Atul Save, Minister for Housing and Other Backward Welfare while guiding the program organized on the occasion of the birth anniversary of Punyashlok Ahilya Devi Holkar. esakal
नाशिक

Nashik News : विभागीय स्तरावर वसतिगृहांसाठी 45 कोटी; मंत्री अतुल सावे यांची माहिती

Nashik : नाशिकसह अन्य तीन ते चार जिल्ह्यांत विभागीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिकसह अन्य तीन ते चार जिल्ह्यांत विभागीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात येत आहे. सरकारतर्फे त्यासाठी ४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. नाशिकमधील वसतिगृहाचे काम सुरू झाले. त्याचप्रमाणे ओबीसी विभागातील विविध योजनांसाठी सात हजार ८०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मागील सरकारच्या काळात केवळ एक हजार ८०० कोटींची तरतूद होती. ( 45 crores for hostels at divisional level Information from Minister Atul Save )

धनगर समाजासाठी घरकुल योजनेची मर्यादा २५ हजारांपर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिली. हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की ३६ जिल्ह्यांत मुला-मुलींसाठी अन्य ७२ वसतिगृहे उभारली जात आहेत.

महाज्योती योजनेतून २५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. धनगरसह अन्य मागासवर्गीय दहा हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देत आहोत. एका शाळेत १०० विद्यार्थी याप्रमाणे त्यासाठी अनुदान देत असल्याचेही त्यांनी सांगितले. महिलांसाठी उभारण्यात येणाऱ्या प्रत्येक वसतिगृहास अहिल्यादेवी होळकर नाव देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजातील तरुणांना व्यवसायासाठी १५ लाखांचे कर्ज, बचत गटासाठी एक लाखापर्यंतचे कर्ज देण्याचा प्रयत्न आहे.

धनगर समाजासाठी दहा हजार घरकुल योजनांची मर्यादा वाढवून २५ हजारांपर्यंत करण्याची अंमलबजावणी लवकरच करणार आहे. येत्या १५ दिवसांत ३६ जिल्ह्यांत बैठक घेऊन त्वरित अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्री. सावे यांनी सांगितले. आताचे सरकार सर्व घटकांना मदत करण्याची भावना ठेवून काम करीत आहे.

सत्तेवर सरकार येताच अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यादेवी होळकरनगर नामकरण करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शेकडो वर्षांपूर्वी मुघल आणि ब्रिटिशांनी दुरवस्था केलेल्या हिंदू मंदिरांचे पुनर्वसन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, बापू शिंदे, भाऊलाल तांबे, अनिल जाधव आदी उपस्थित होते.

माँसाहेबांचे आदर्श स्त्रियांनी घ्यावे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहे. सुमारे ३०० वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले. स्त्रियांवर टाकलेली कुठलीही जबाबदारी त्या उत्कृष्टपणे पार पाडू शकतात. त्यांचा आदर्श स्त्रियांनी डोळ्यांसमोर ठेवून समाजात वावरावे. स्त्रीशक्तीचे दर्शन घडवून आणावे, असे आवाहन स्वप्नीलराजे होळकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT