Farmer  esakal
नाशिक

Nashik News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी 47 शेतकरी पात्र

Nashik News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास मदत दिली जाते.

रवींद्र पगार : सकाळ वृत्तसेवा

कळवण : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास मदत दिली जाते. त्यानुसार या योजनेंतर्गत कळवण कृषी विभागाच्या वतीने २०२३-२४ मध्ये एकूण ४७ लाभार्थी पात्र ठरले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना ९ डिसेंबर २०१९ पासून सुरू झाली. (47 farmers eligible for Gopinath Munde Farmer Accident Scheme)

परंतु, या योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी न झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांचा शासनाबाबत रोष वाढल्यामुळे सरकारने योजनेत सुधारणा करुन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना १७ एप्रिल २०२३ पासून राबविण्यास सुरूवात केली. पूर्वी अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या एकाच नातेवाईकांना भरपाई मिळत होती.

परंतु, सुधारित योजनेत अपघातग्रस्त शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी वहितीधारक शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणीही एक व्यक्ति) अशा एकूण दोघांकरीता योजना राबविण्यात येणार आहे.

अशी आहे कार्यपद्धती

अपघातग्रस्त शेतकऱ्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी, तालुका कृषि अधिकाऱ्यांचे पथक प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करते. त्याबाबतचा अहवाल तहसिलदारांना घटना झाल्यापासून ८ दिवसांच्या आत सादर करतात. (latest marathi news)

३० दिवसांची मुदत

तालुका कृषि अधिकारी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून पात्र असलेले विमा प्रस्ताव संबंधित तहसिलदारांना सादर करतात. त्यानंतर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसाच्या आत शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येवून संबंधित तालुका कृषि अधिकाऱ्यांमार्फत संबंधित अपघातग्रस्त शेतकरी, वारसदारांच्या बँक खात्यात निधी जमा करण्यात येतो.

या घटनांचा समावेश

योजनेंतर्गत अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, सर्पदंश व विंचूदंश, जनावरांच्या खाल्यामुळे, चावण्यामुळे जखमी/मृत्यू, अन्य कोणताही अपघात या कारणांपैकी एकाने बाधित झाल्यास संबंधिताला योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो.

असे आहे लाभार्थी

कळवण : ७

दिंडोरी : १५

सुरगाणा : ११

देवळा : १४

"आर्थिक लाभ देण्यासाठी विहितीधारक शेतकरी व दोन जणांकरीता योजना राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत २०२३-२४ मध्ये एकूण ४७ लाभार्थी योजनेच्या लाभाकरीता पात्र ठरलेले आहेत. इतरांनी सुद्धा त्याचा लाभ घ्यावा." - अशोक डमळे, उपविभागीय कृषी अधिकारी, कळवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT