Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News: शहरात चालकाच्या दूर्लक्षपणामुळे 5 अपघात! वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन; दोन दाम्पत्यांसह 10 जखमी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : शहर परिसरामध्ये दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात दंडात्मक कारवाई देखील केली जाते. तरीही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे सातत्याने अपघाताच्या घटना घडत असून, यात अनेकजण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. शहरातील पाच अपघाताच्या घटनांमध्ये दोन दाम्पत्यांसह दहा जण जखमी झालेले आहेत. (Nashik 5 accidents due to negligence of driver in city)

राहुल काशिनाथ आहेर (रा. बाणगंगा सोसायटी, म्हसरूळ) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. २८) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास त्यांचे वडील काशिनाथ हरिभाऊ आहेर (६४) हे कणसरा माता चौक ते बोरगड या रस्त्यावर वॉकिंग करीत होते. त्याचवेळी भरधाव वेगातील मालवाहतूक करणारी रिक्षाने (एमएच ४७ एडब्ल्यु ०४४१) त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

यात त्यांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्या घटनेत ट्रॅव्हल बसने कारला धडक दिल्याने चौघे जखमी झाले आहेत. बाबासाहेब जंगल क्षीरसागर (मूळ रा. सौंदाणे ढोकी, ता. कळंब, जि. धाराशिव) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. २८) पहाटे साडेतीनच्या सुमारास ते नांदूर नाक्याकडून जत्रा हॉटेलकडे जाण्यासाठी त्यांच्या कारने वळण घेतले.

त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रॅव्हल बसने (एमएच ०३ सीपी ४५४५) क्षीरसागर यांच्या कारला धडक दिली. यामुळे कारमधील क्षीरसागर यांच्यासह सुरज जाधव, वैभवकुमार देशमुख व दत्तात्रय असे चौघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आडगाव पोलिसात बसचालक परमेश्वर बाबुराव दणके (३६, रा. म्हाडा कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आडगाव येथील डी-मार्टसमोरील सर्व्हिसरोडवर भरधाव वेगातील कारने (एमएच १५ जीआर ४२८१) समोरून येणार्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार अनिता दिलीप गांगुर्डे (रा. मु.पो. ढकांबे, ता. दिंडोरी) व त्यांचे पती यांना दुखापत झाली असून, याप्रकरणी आडगाव पोलिसात अज्ञात कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आहे.

तर, गोविंदनगर येथील सागर स्वीटसमोर भरधाव वेगातील कारने (एमएच १६ एएन ५०५५) मोपेडला धडक दिली. यात मोपेडस्वार महिला उज्ज्वला दीपक निकम (३७), त्यांचे पती दीपक श्रीधर निकम (४३, दोघे रा. रुंग्टा इम्पेरियल, कर्मयोगीनगर) हे दोघे जखमी झाले आहेत.

रविवारी (ता. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या या अपघातप्रकरणी उज्ज्वला निकम यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दारणा पुलाजवळ गतीरोधकावर ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने कंटेनर चालक जखमी झाला.

सुरेश चंद्रशेखर कंदमुळे (३३, रा. गांधीनगर, कालमागदी बिदर, कर्नाटक) असे जखमीचे नाव आहे. अब्दुल अजिज अब्दुल रज्जाक इनामदार (रा. जुन्नर, ता. पुणे) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता.२८) पहाटे साडेपाचच्या सुमारास सदरचा अपघात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मित्राला बोनेटवर बसवून चालविली कार

आनंदवल्लीकडून जेहान सर्कलकडे जाताना संशयित कारचालकाने त्याचा मित्र शुभम बळीराम चव्हाण यास त्याच्या किया कारच्या बोनेटवर बसवून कार चालविली. सदरचा प्रकार २१ तारखेला रात्री साडेनऊच्या सुमारास घडला आहे. यामुळे रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न केल्याने पोलीस अंमलदार रवींद्र मोहिते यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याकडे दूर्लक्ष

- दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतराचा अभाव

- वाहनाच्या वेगावर अनियंत्रण

- अचानक ब्रेक लावणे

- साईड मीरर न पाहता वळण घेणे

- नियमबाह्य लेन कटिंग करणे

"वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघाताची शक्यता मावळते. शिस्तपालन करून वाहन चालविले तर अपघात टाळता येऊ शकतात. तसे केल्यास वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होते." - चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT