Nashik Gangapur Dam esakal
नाशिक

Nashik Gangapur Dam : गंगापूर धरणसाठ्यात 5 टक्के वाढ; 2 दिवसांच्या संततधार पावसामुळे दिलासा

Gangapur Dam : जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सुमारे पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Gangapur Dam : जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सुमारे पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.२३) सकाळी ६ वाजेपर्यंत गंगापूर धरणात ३६.८२ टक्के साठा असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. परंतु, दिवसभर धरणसाठ्याच्या परिसरात संततधार पाऊस सुरुच राहिल्याने यात दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ( 5 percent increase in Gangapur dam storage relief due to 2 days of continuous rain )

दरम्यान, जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झालेली दिसून येते. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम स्वरूपाच्या २४ धरणांमध्ये २९.३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मंगळवारी दिवसभरात शहरात २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर घोटीला ९१, इगतपुरीला १२३, त्र्यंबकेश्‍वर ८४, आंबोली ११२ मिलीमीटर पाऊस पडल्याने नैसर्गिक नाल्यांमधून पाणी वाहू लागले आहेत. गंगापूर धरण्यात दोन दिवसांपूर्वी ३३ टक्के साठा होता.

आता तो ३६.८२ पर्यंत पोचला आहे. यातही अजून दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे गंगापूरमध्ये सरासरी पाच टक्क्यांची वाढ झाल्याचे बोलले जाते. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर मिळाला. शिवाय खरीप हंगामाला जीवदान मिळाले आहे. दुष्काळग्रस्त येवला, नांदगाव, मालेगाव या तालुक्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पुढील २४ तासांत घाट माथ्यावरील भागासाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. तसेच शहरात दिवसभर रिपरिप सुरु राहील, असा अंदाज आहे. (latest marathi news)

धरणसाठा (टक्के) व पाऊस (मिलीमिटर)

गंगापूर ३६.८२.....४५

कश्‍यपी १५.३९....५७

गौतमी गोदावरी ३५.३३......६०

आळंदी ४.५३...........३०

पालखेड १३.६३.........६

करंजवण २.०३.........४५

वाघाड ७.३४.........३५

ओझरखेड ००..........१५

पुणेगाव ००........१५

तिसगाव ००.......०३

दारणा ६६.५३.........३२

भावली ८९.९६........१३६

मुकणे १९.३८........३३

वालदेवी ३१.०७........४१

कडवा ५५.८६.......१५

नांदुर मध्यमेश्‍वर १००.....०६

भोजापूर ००.........११

चणकापूर ५.३६.........

हरणबारी १३.०४......

केळझर ०६.८१........

नाग्यासाक्या ००........

गिरणा १२.००..........

पुनद २५.००.......

माणिकपुंज ००........

एकूण-२९.३९ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT