RTE Admission  esakal
नाशिक

RTE Admission : जिल्ह्यात ‘आरटीई’तून 5 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश! जुन्या पद्धतीने प्रवेशप्रकिया

Nashik News : शासकीय शाळात प्राधान्याने प्रवेश या धोरणाला विरोध झाल्यावर न्यायालयाच्या सूचनेने आता जुन्याच पद्धतीने आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवावी जाणार आहे.

संतोष विंचू

येवला : ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेत बदल करून मागेल त्याला प्रवेश आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळून शासकीय शाळात प्राधान्याने प्रवेश या धोरणाला विरोध झाल्यावर न्यायालयाच्या सूचनेने आता जुन्याच पद्धतीने आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवावी जाणार आहे. यानुसार जिल्ह्यासाठी पाच हजार जागांवर प्रवेश मिळेल. (5 students will get admission from RTE in district)

या जागा इंग्रजी माध्यमाच्या असल्याने पालकांतून समाधान व्यक्त होत आहे. यासाठी शुक्रवार (ता. १७)पासून ऑनलाइन अर्ज भरणे सुरू झाले असून, ३१ मेपर्यंतची ‘डेडलाइन’ देण्यात आली. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

दरवर्षी फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळांत ‘आरटीई’चे प्रवेश दिले जात होते. यामुळे पालकांत प्रवेशासाठी चढाओढ होती. किंबहुना आपल्या मुलाला प्रवेश मिळावा, यासाठी सुरवातीपासून पालक प्रयत्नशील राहत होते. मात्र, शुल्क प्रतिपूर्ती वेळेत होत नसल्याने खासगी शाळा संचालकांचा आरटीई प्रवेशांना विरोध होता.

तसेच, शुल्क प्रतिपूर्तीची दोन हजार ४०० कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कायद्यात बदल करून शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा ‘आरटीई’तून वगळण्यात आल्या होत्या.

या निर्णयाला पालकांनी आव्हान दिल्यावर न्यायालयाने शासनाचा हा निर्णय स्थगित केला असल्याने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या बदलामुळे जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेल्या ५३ हजार जागा पाच हजारांवर आल्या. अर्थात, या जागा इंग्रजी माध्यमाच्या असल्याने पालकांचे समाधान झाले असून, प्रतिसादही मिळणार आहे. (latest marathi news)

पहिल्याच दिवशी १२०० अर्ज!

आरटीई पोर्टलवर बदललेल्या नियमानुसार दाखविण्यात येणाऱ्या शाळा व जागांची माहिती हटविण्यात आली असून, नवीन माहिती अपलोड करण्यात आली. सुरवातीला जिल्ह्यात यंदा ५३ हजार जागा असताना अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतीत केवळ चार हजार ७६७ अर्ज दाखल झाले होते, इतका पालकांचा निरुत्साह होता.

आता जुन्या पद्धतीने ४२८ शाळांत पाच हजार २६८ जागांवर प्रवेश दिला जाणार असून, ही संख्या पोर्टलवर दाखवली आहे. विशेष म्हणजे प्रवेश अर्ज भरण्यासाठी आज पोर्टल सुरू झाले असून, पहिल्या दिवशी एक हजार २२४ अर्जही दाखल झाले. राज्यात आजच १९ हजार अर्ज दाखल झाले असून, ३१ मेपर्यंत किती अर्ज येणार, याकडे लक्ष असून, त्यानंतरच राज्यस्तरावरून सोडत काढण्यात येणार आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल. ‘आरटीई’अंतर्गत यापूर्वी ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या बालकांच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

आरटीई संकेतस्थळावर जाहीर केलेल्या जिल्हानिहाय सुधारित शाळांची संख्या आणि प्रवेश क्षमतेनुसार राज्यातील नऊ हजार १३६ खासगी शाळांमधील एक लाख दोन हजार ४२८ जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असून, आता प्रवेशप्रक्रियेत नव्याने अर्ज करण्यासाठी वेळापत्रक जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

● २०२३-२४ मधील प्रवेश जागा

महाराष्ट्र :

पात्र शाळा- ८,८२०

प्रवेश क्षमता- १,०१,८८१

नाशिक ः

पात्र शाळा- ४०१

प्रवेश क्षमता- ४,८५४

● २०२४-२५ मधील प्रवेश जागा

● महाराष्ट्र :

पात्र शाळा- ९,१३६

प्रवेश क्षमता- १,०२,४२८

● नाशिक ः

पात्र शाळा- ४२८

प्रवेश क्षमता- ५,२६८

‘आरटीई’च्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याने स्वागत आहे. मात्र, शासनाने प्रवेशाचे शुल्क शाळांना दरवर्षी वेळेत दिले तर सर्व कामकाज व प्रक्रिया सुरळीत चालेल. - मकरंद सोनवणे, संचालक, अंदरसूल शिक्षणप्रसारक मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT