NMC & Mobile Towers  esakal
नाशिक

Nashik News : उत्पन्नवाढीसाठी मनपाच्या जागांवर 500 मोबाईल टॉवर; पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना

Nashik : महापालिकेच्या जागांवर ५०० मोबाईल टॉवर उभारले जाणार असून त्यात पहिल्या टप्प्यात दहा जागांवर टॉवर उभारणीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : उत्पन्नात वाढ करण्यासाठी नागपूरच्या धर्तीवर महापालिकेच्या जागांवर ५०० मोबाईल टॉवर उभारले जाणार असून त्यात पहिल्या टप्प्यात दहा जागांवर टॉवर उभारणीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्पन्नवाढीच्या उपक्रमाला प्रतिसाद कसा मिळतो, यावर महापालिकेचे आर्थिक उत्पन्न अवलंबून राहणार आहे. शहराचा विस्तार वाढत असताना मूलभूत गरजांपैकी आता महत्त्वाची गरज म्हणून मोबाईल व नेटवर्कचे महत्त्व वाढले आहे. (500 mobile towers on municipal place to increase income )

मोबाईल टॉवरच्या अपुऱ्या संख्येमुळे नेटवर्क मिळत नाही, दुसरीकडे शहरात जवळपास ८०६ मोबाईल टॉवर असून त्यातील परवानगी घेतलेल्या मोबाईल टॉवरची संख्या अतिशय कमी आहे. मोबाईल टॉवर संदर्भात शासनाने नियमावली केली नाही. त्यामुळे करवसुली करताना अडचण निर्माण होते. महापालिकेच्या नगररचना विभागाला मोबाईल टॉवर ज्या इमारतीवर आहे, तेथील चेअरमनला नोटीस पाठवण्यापलीकडे अधिकार नाही.

नोटीस पाठविल्यानंतरदेखील अधिकृत टॉवरसाठी महापालिकेकडे २४० प्रस्ताव दाखल झाले. त्यातील १६७ मोबाईल टॉवर नियमित करण्यात आले. मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉवरचे नियमितिकरण नाही, तर दुसरीकडे न्यायालयाकडून मोबाईल टॉवर सील करण्याचीदेखील परवानगी नाही. त्यामुळे महापालिका व मालकीच्या जागांवर मोबाईल टॉवर उभारणार आहे.

या माध्यमातून वार्षिक बावीस कोटी रुपयांची उत्पन्न मिळविण्याचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात ३० मोबाईल टॉवरसाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र नुकत्याच लोकसभा व विधानसभा निवडणुका आचारसंहिता संपुष्टात आल्याने तातडीची बाब म्हणून दहा मोबाईल टॉवरला परवानगी दिली जाणार आहे. मोबाईल टॉवर उभारल्यानंतर प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील टॉवर उभारले जाणार आहे. त्यानंतर खासगी इमारतीवरील मोबाईल टॉवर टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार आहे. (latest marathi news)

अडीच ते तीन लाख उत्पन्न अपेक्षित

शासनाकडून जीएसटी अनुदानापोटी मिळणाऱ्या उत्पन्न व्यतिरिक्त घर व पाणीपट्टी तसेच नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगीच्या माध्यमातून विकास शुल्क महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. कर व नगर रचना विभागाने राबविलेल्या उपायोजनामुळे दोन वर्षात महापालिकेच्या महसुलात वाढ झाली असली तरी १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानासाठी शासनाने महसूल वृद्धीच्या सूचना दिल्या आहेत.

आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विकास कामांसाठी महापालिकेच्या रक्कम अदा करावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेला मोठी कसरत करावी लागेल. त्यामुळे उत्पन्नवाढीच्या आवश्यक उपाययोजनेचा भाग म्हणून महापालिकेच्या इमारती , रस्ते, दुभाजक, मोकळे, भूखंड, मोबाईल टॉवर उभारण्यासाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून नागपूर व पुणे महापालिकेच्या धर्तीवर वापरात नसलेल्या मोक्याच्या जागा व इतर जागांवर मोबाईल टॉवर उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी महापालिकेने अधिसूचना प्रसिद्ध केली असून हरकती न आल्यास स्वारस्य देकार पद्धतीने मोबाईल कंपन्यांना जागा भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहे. एका मोबाईल टॉवरच्या माध्यमातून अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

''महापालिकेच्या उत्पन्नात भर घालण्याबरोबरच खासगी इमारतींवर धोकादायकरीत्या मोबाईल टॉवर उभारले जात असल्याने त्यातून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या दोन्ही उद्देशातून महापालिकेने मोबाईल टॉवरसाठी भाडेतत्त्वावर जागा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.''- श्रीकांत पवार उपायुक्त प्रशासन.

येथे उभारणार मोबाईल टॉवर

- आकाशवाणी टॉवर भाजी मार्केटजवळील जागा

- वेलकम इंटरनॅशनल स्कूल गंगापूर रोड.

- इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक कमोदनगर.

- घाडगेनगर गायखे कॉलनी देवळाली.

- गोरक्षनगर उद्यान दुभाजक म्हसरूळ पोलिस चौकी

- वडाळा पाथर्डी रोड सुदर्शन मंगल कार्यालय

- श्री श्री रविशंकर मार्ग

- प्रमोदनगर गोदावरी नदी लगत

- दत्तात्रयनगर हनुमानवाडी

- जाखडीनगर इंदिरानगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT