snakebite  esakal
नाशिक

Nashik News : कसमादेत 15 महिन्यात 501 जणांना सर्पदंश; एकाचा मृत्यू

Nashik : शहरासह कसमादे परिसरात विशेषत: पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असते.

जलील शेख

Nashik News : शहरासह कसमादे परिसरात विशेषत: पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असते. गेल्या दीड वर्षात सर्पदंश झालेल्यांमध्ये शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. येथील सामान्य रुग्णालयात एप्रिल २०२३ ते ३० जून २०२४ पर्यंत ५०१ सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील पाचशे जणांचे प्राण वाचविण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले. वेळेत उपचार न मिळाल्याने एका व्यक्तीचा मात्र यात मृत्यू झाला. ( 501 people died of snakebite in Kasmade in fifteen months )

कसमादेत शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या भागात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत. डाळिंब व कांदा ही पीके प्रामुख्याने वर्षभर घेतली जातात. खरीप, रब्बी हंगामासह फळ शेतीमुळे वर्षभर हजारो शेतमजुरांना काम मिळत असते. याच दरम्यान सर्पदंशाच्या घटना प्रामुख्याने घडतात. जून ते सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यामुळे अनेक ठिकाणी सापांचे बिळ बंद होतात. शेतात उंदीर व इतर किडे खाण्यासाठी सापांचा शेतात वावर असतो.

वीज महावितरण कंपनी शेतीपंपांना रात्री अपरात्री वीजपुरवठा करीत असते. त्यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात यावे लागते. शेतात काम करत असताना अनावधानाने सापावर पाय पडल्यास सर्पदंशाच्या घटना घडतात. बहुसंख्य शेतकरी शेतात जनावरांसाठी चारा राखून ठेवतात. बाजरी, मका यांच्या पेंढ्या रचून ठेवल्या जातात. अशा चाऱ्यात अनेक वेळा साप लपून बसलेले असतात. (latest marathi news)

साप कडब्यामध्ये व चाऱ्यामध्ये लपलेले असतात. जनावरांसाठी चारा काढतांना अनेक वेळा शेतकरी व मजुरांच्या हाताला सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या पंधरा महिन्यात कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, मालेगाव, नांदगाव यासह परिसरातील गावांमध्ये ५०१ जणांना सर्पदंश झाला. यातून ५०० जणांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे जीव वाचले. तसेच एकाचा यात मृत्यू झाल्याचे येथील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिस मोमीन यांनी सांगितले.

साप चावल्यानंतरची लक्षणे

विषारी साप चावल्यानंतर अंग जड पडते. तसेच श्‍वास अडकतो. डोळ्याने दोन प्रतिकृती दिसतात. अस्वस्थ वाटते. तसेच बिनविषारी साप चावल्याने जागेवर सुज येणे, मळमळ होणे यासह अनेक लक्षणे रुग्णांना दिसून येतात. नागरीकांनी भोंदूबाबांकडे न जाता वेळेत जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत. सर्पदंश झाल्यास सामान्य रुग्णालयात रुग्णांना ॲन्टी स्नेक विनम ही लस दिली जाते.

''सर्पदंश झाल्यास नागरीकांनी घाबरु नये. जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत. येथील सामान्य रुग्णालयात सर्पदंशावर आधारित सर्व उपचार उपलब्ध आहेत. घराबाहेरचे गवत काढावे. शेतकरी बांधवांनी शेतात काम करताना काळजी घ्यावी. तसेच शेतात काम करताना मोठे रबरी बूट घालावेत.''- डॉ. योगेश पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, मालेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election 2024 : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT