Ravan Dahan Godaghat esakal
नाशिक

Dussehra 2024 : नाशिक रामतीर्थावर आज 51 फुटी प्रतिकात्मक रावणदहन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रामतीर्थाशेजारील चतुःसंप्रदाय आखाड्यातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरातर्फे यंदाही रावणदहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याला यंदा ५७ वर्षे पूर्ण झाली असून रावणाची ५१ फुटांचा प्रतिकात्मक पुतळा उभारण्यात आला आहे. महंत दीनबंधूदास महाराज यांनी १९६७ साली या ठिकाणी दसऱ्याला प्रतिकात्मक रावणदहन सुरू केले. त्यांच्यानंतर ही परंपरा महंत कृष्णचरणदास महाराज यांनी सुरू ठेवली. रावणाचा प्रतिकात्मक पुतळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. (51 feet symbolic burning of Ravana at Ram Tirtha today )

फटाक्यांची आतषबाजी प्रमुख आकर्षण

रावणदहनापूर्वी राम व रावणाच्या सेनेत तुंबळ युद्ध होते. तत्पूर्वी श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, रावण, बिभीषण यांची वेशभूषा करून परिसरात मिरवणूक काढण्यात येते. आखाड्यापासून निघालेली ही मिरवणूक पुढे नाग चौक, सीता गुंफा, काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, सरदार चौक, कपालेश्‍वर मंदिराकडून रामतीर्थावर पोचते. त्या ठिकाणी राम- रावण सेनेत तुंबळ युद्ध होते. युद्धानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी होते, त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत रावणदहन सोहळा पार पडतो. या वेळी विविध आखाड्यांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत. ५६ वर्षांपासून सायंकाळी रंगणारा हा सोहळा नाशिककरांचे प्रमुख आकर्षण ठरला आहे. (latest marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Dasara Melava : दसरा मेळावा अन् पंकजा मुंडे... वारशाबद्दल धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Dussehra Melava 2024 Live Updates: "भगवा फडकणार, मशाल धगधगणार," ठाकरे गटाचा तिसरा टीजर जारी

Mumbai Local Mega Block:मुंबईकरांनो लक्ष द्या; आजपासून दोन दिवस विशेष मेगाब्लॉक!

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer ०, पृथ्वी शॉ ७ अन् अजिंक्य रहाणे...; मुंबईची लागलीय वाट, ६ खेळाडू तंबूत परतले

Manoj Jarange: आचारसंहितेपर्यंत वाट पाहणार, न्याय मिळाला नाही तर... मनोज जरांगेंनी पुढची दिशाच सांगितली!

SCROLL FOR NEXT