This is the building here, there was a turnover of crores during the day. esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : दामदुपटीच्या आमिषाने 51 लाखांना गंडा; लासलगावात गुन्हा

Fraud Crime : दामदुपटीच्या आमिषाने फसवणुकीने सहा महिन्यांपूर्वीच लासलगावकर पोळलेले असताना पुन्हा तशाच प्रकाराला येथील नागरिक बळी पडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : कमी दिवसांत दामदुपटीच्या आमिषाने फसवणुकीने सहा महिन्यांपूर्वीच लासलगावकर पोळलेले असताना पुन्हा तशाच प्रकाराला येथील नागरिक बळी पडले आहेत. केवळ ४० दिवसांत रक्कम दामदुप्पट आणि दुचाकी बक्षिसाच्या आमिषाला बळी पडून येथील दोघा भामट्यांनी लासलगावकरांना गंडा घातला आहे. स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत ही योजना चालविणारे प्रमुख सतीश पोपटराव काळे (रा. टाकळी विंचूर), संचालक योगेश परशुराम काळे (रा. भरवस, वाहेगाव) यांच्याविरुद्ध लासगाव पोलिसांत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (51 lakh fraud crime in Lasalgaon with lure of double money )

सोमनाथ गांगुर्डे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दरम्यान, एकाच व्यक्तीची ही फसवणूक आहे. लासलगावातील अनेकांनी त्यात रक्कम गुंतविली असन, हा आकडा दोनशे कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश आणि योगेश काळे फरारी असून, त्यांचा कसोशीने शोध घेतला जात आहे.

सहा वर्षांआधी ढोकेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून लासलगाव व राज्यभरातील गुंतवणूकदारांची शंभर कोटींहून अधिकची फसवणूक केल्यानंतरही पुन्हा गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी सुरू करत झटपट श्रीमंत होण्याच्या योजना काढत नागरिकांना या टोळीने आकर्षित केले होते. आता लासलगावमध्ये पुन्हा तोच प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यामध्ये मोठ्या राजकीय पुढाऱ्यांसह छोटे-मोठे व्यापारी, संस्था, महिला, बँकेचे कर्मचारी, शिक्षक, तर काही मंदिरांच्या ट्रस्टनेही पैसे गुंतविल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

अशी होती योजना

तीन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ४० दिवसांत पैसे दुप्पट व एक दुचाकी मोफत आणि दहा लाखांच्या गुंतवणुकीवर ४० दिवसांत पैसे दुप्पट व एक चारचाकी मोफत अशा भन्नाट युक्त्या वापरण्यात आल्याने मोहापायी नागरिकांनी कंपनीमध्ये रक्कम गुंतविली आहे. संचालकांनी यासाठी काही दलालही नेमले होते. त्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची माया जमविली आहे. लासलगावसह परिसरातून अनेकांनी येथे रक्कम गुंतविली आहे.

जसे तक्रार करण्यास नागरिक पुढे येतील तसा हा आकडा वाढत जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही याच संस्थाचालकाकडून फसवणूक झालेली असतानाही अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या लोभापोटी स्वतःची फसवणूक केल्याचे या घटनेवरून दिसत आहे. यामध्ये अनेक छोट्या गुंतवणूकदारांनी स्वतःचे सोने-नाणे गहाण ठेवून, मोडून, स्वतःच्या घरावर कर्ज काढून रक्कम गुंतविली आहे. काहींनी नातेवाइकांकडून पैसे आणत योजनेत टाकले.

दलालांना मोठे कमिशन

यामध्ये मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय होऊन १० टक्के कमिशन घेत सर्वसामान्य नागरिकांना दामदुपटीचे आमिष दाखविले गेले. काही महाभाग दलालांनी तर स्वतःचे धनादेशही गुंतवणूकदारांना दिल्याची माहिती आहे. कंपनीचे दोघे फरारी असल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे.

यंदाची दिवाळी कडू होणार

या वर्षी गणेशोत्सव व थोड्याफार प्रमाणात नवरात्रोत्सव लाभार्थ्यांनी आनंदात व उत्साहात साजरी केला, परंतु दिवाळी सुरू होण्याच्या काही काळापूर्वीच कंपनीचे दोघे पसार झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. गेल्या आठ महिन्यांमध्ये या योजनेचा फायदा घेणाऱ्या लाभार्थ्यांनी रकमेच्या भरवशावर चारचाकी व दुचाकी, शेती, नवीन दुकान, वाहनांसोबतच घराचे व्यवहार केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT