52 thousand farmers deprived of drought relief esakal
नाशिक

Nashik News : दुष्काळी मदतीपासून 52 हजार शेतकरी वंचित!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दुष्काळामुळे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन अपडेट करण्यात आली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी स्वत:चे बँक खाते, आधार क्रमांक व इतर अनुषंगिक माहिती संलग्न न केल्याने जिल्ह्यातील ५२ हजार ७८२ शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये थोडाफार पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. (52 thousand farmers deprived of drought relief)

जुलैमध्ये काही दिवस पाऊस झाल्याने पिकांनी जमिनीतून डोके वर काढले. पण, ऑगस्ट पूर्ण कोरडा गेल्याने गुडघ्याएवढे झालेली पिके जागेवरच करपली. नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांची माहिती अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसील कार्यालयांमार्फत तलाठी कार्यालये व बाधित ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात खरीप हंगाम २०२३ मध्ये १७ हजार ९५० बाधित शेतकऱ्यांनी ही माहिती अपलोड केलेली नाही. (latest marathi news)

तसेच, नंतरच्या काळात अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यामुळे बाधित झालेल्या जवळपास ३४ हजार ८३२ शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते आधारकार्डबरोबर संलग्न केले आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

पोर्टलवर अपलोड केलेल्या यादीतील ज्या बाधित शेतकऱ्यांनी अद्याप प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT