सिन्नर : तालुक्यातील सहा ब्रिटिश कालव्यांचे बंद सिमेंट नलिकेत रूपांतर होणार आहे. त्यामुळे कालव्यांची वहन क्षमता वाढून सुमारे ९४० हेक्टरला त्याचा लाभ होणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांमुळे जलसंधारण महामंडळाने १३ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. (Nashik MLA Kokate marathi news)
वीसहून अधिक गावांना फायदा
वडगाव-धोंडवीरनगर कालव्याची लांबी सहा किलोमीटर असून, ९०० मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनद्वारे पाणी वडगाव, आटकवडे, सोनारी, लोणारवाडी, भाटवाडी, सिन्नर, मनेगाव, पाटोळे, रामनगर, धोंडवीरनगर आदी भागांत पोचणार आहे. सुमारे २०० हेक्टरला लाभ होणार आहे.
लोणार नदी ते लोणारवाडी कालव्याची लांबी दोन किलेमीटर असून, त्याच्या ९०० मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनची वहन क्षमता १३ क्यूसेस आहे. यातून लोणारवाडी व भाटवाडी येथील १०० हेक्टरला फायदा होणार आहे. सुमारे ३.५ किलोमीटरच्या कुंदेवादी-मुसळगाव कालव्यासाठीही ९०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकण्यात येणार असून, तिची वहनक्षमता १५ क्यूसेस आहे.
कुंदेवाडी व मुसळगावच्या १५० हेक्टरला लाभ होईल. मुसळगाव- दातली कालव्याच्या ९०० मिलिमीटर पाइपलाइनमधून १५ क्यूसेस क्षमतेने पाणी वाहणार असून, मुसळगाव, दातली व खोपडी येथील ३०० हेक्टर ओलिताखाली येणार आहे. गगन बंधारा ते बोडके वस्ती सोनांबे १.५ किलोमीटर कालव्याच्या पाइपलाइनचा व्यास ६०० मिलिमीटर असून, त्यातून १२ क्यूसेस क्षमतेने पाणी वाहणार आहे.
त्याचा फायदा कोनांबे व सोनांबे येथील ९० हेक्टरला होईल. म्हाळुंगी नदी ते टेंभुरवाडी १.५ किलोमीटर कालव्याची वहन क्षमता १२ क्यूसेस असून, त्यासाठी ६०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकली जाणार आहे. त्यातून टेंभुरवाडी येथील १०० हेक्टरला फायदा होईल. (Latest Marathi News)
बंदिस्त नलिकेचे काम पूर्ण होताच सहा कालव्यांच्या पाण्याने परिसरातील बंधारे पूरपाण्याने भरले जातील. त्यामुळे या भागातील भूजल पातळीही वाढली जाईल. शिवाय योजनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
पश्चिमी वाहिनी नद्यांच्या पाण्याचा फायदा होणार
पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी सिन्नर तालुक्यात पडणार असून, एकदा नद्यांमध्ये ते पाणी आले, की बाराही महिने कालव्यांद्वारे पाणी वाहत राहील. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. बंदिस्त कालवे मंजूर झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
"आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या बंदिस्त कालव्यांमुळे शेतीला पुरेसे आवर्तन मिळेल. उघड्या कालव्यांमध्ये नागरिक घाण टाकतात. त्यातून दुर्गंधी सुटते व आरोग्याची समस्या निर्माण होते. आता कालवे बंदिस्त झाल्यानंतर सर्वच समस्या सुटतील."
-जयश्री लोणारे, सरपंच
"वीज, रस्ते, पाणी या सुविधा केल्या, तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ब्रिटिशकालीन सहा कालव्यांची फक्त डागडुजी करून उपयोग होणार नाही, ही बाब लक्षात आली. पाइपलाइनद्वारे कालवे बंदिस्त करून त्यांना संजीवनी देणे गरजेचे होते. त्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळविण्यात यश आले. आणखी १५ ते २० योजनांचे सर्व्हेक्षण झाले असून, त्याही लवकरच मंजूर होतील."-ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.