When the tanker arrived, the villagers rushed to fill the water. Tanker to fill water at Nandur well. esakal
नाशिक

Water Crisis: योजना थकल्या अन्‌ पाण्यासाठी धावाधाव! ६० गावे-वाड्यांना 35 टॅंकरने पाणीपुरवठा तर येवल्यात 5 दिवसांआड पाणी

Water Crisis : टॅंकरने किती गावांची किती प्रमाणात गरज भागणार, ही समस्या भेडसावत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

येवला : अजून फेब्रुवारी संपला नाही, तोच येवल्यात पाणीबाणी गंभीर झाली आहे. उत्तर पूर्व भागातील विहिरींसह कूपनलिका कोरड्याठाक झाल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. उद्भव कोरडे झाल्याने अनेक योजना बंद पडल्या आहेत.

टॅंकरने किती गावांची किती प्रमाणात गरज भागणार, ही समस्या भेडसावत आहेत. शहराच्या साठवण तलावाचेही पाणी आटत असल्याने नगरपालिकेने शहराला चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येवलेकरांना पाचव्या दिवशी पाणी मिळणार आहे. (Nashik water crisis in yeola marathi news)

साडेसाती नशिबीच पुजलेल्या येवला तालुक्यातील ५० ते ६० गावे वाड्यांना दरवर्षी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यंदा हा आकडा शतक पार करेल इतकी भयावह स्थिती आहे. पाणीसाठा आटू लागल्याने गावोगावी टंचाईची ढग अधिक गडद होऊ लागली आहे.

तालुक्यात यंदा पर्जन्यमानाने धोका दिला. जून ते डिसेंबरची वार्षिक सरासरी ५४४ मिलिमीटर असताना, अवघा ४२५ मिलिमीटर पाऊस झाल्याने तालुक्यात ‘खरिपा’चा वनवा पेटून पालापाचोळा झाला. पावसाळ्यात पूर्व भागातील विहिरींना पाणी न उतरल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली.

त्याचे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत. मुळात ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या तालुक्यात दरवर्षीच टंचाईच्या झळा अल्प पावसामुळे डिसेंबरपासूनच जाणवतात. कितीही चांगला पाऊस झाला, तरी मार्चपासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. २०२३ मध्ये मार्चपासून टँकरची मागणी सुरू झाली होती.

प्रशासनाने चालढकल करत ११ एप्रिलपासून तालुक्यात टँकर सुरू केले. पहिल्याच दिवशी तब्बल १२ गावांना टँकर मंजूर झाले होते. त्या दिवसापासून सुरू झालेले टँकर आजही अव्याहत सुरूच आहेत. पावसाळ्याचे चार महिनेही टँकर बंद होऊ शकलेले नाहीत. आता जलस्रोतांचे पाणी आटले आहे. विहिरी, कूपनलिका माना टाकत असल्याने गावोगावी टंचाईची स्थिती अधिकच गंभीर होत आहे.

फेब्रुवारी सुरू असतानाच तालुक्यात ४४ गावे आणि १५ वाड्यांना ३५ टँकरद्वारे रोज ५९ खेपातून पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यावर सुमारे ६५ ते ७० हजारांवर नागरिक अवलंबून आहेत. सर्व टँकर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तालावालगतच्या नांदूर विहिरीहून भरले जातात.

ग्रामीण भागात पाणी नसल्याने नांदूर विहिरीतून तब्बल ३० ते ३२ किलोमीटरवर टँकर पाणी घेऊन जात असल्याने प्रशासनाचा खर्चही वाढला आहे. पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात आवर्तनाने जलस्रोतांना पाणी उतरल्याने हलका आधार मिळाला आहे. ३८ गाव पाणीपुरवठा योजनेवरही सुमारे पन्नासवर गावे टँकरमुक्त झाली असली, तरी गाव व वाड्यांवर पाणीटंचाई भेडसावत आहे. उत्तर पूर्व भागात सर्वत्र ओसाड माळरान आणि तळ उघड्या पडलेल्या विहिरी आहेत. (Latest Marathi News)

चिंता उद्याच्या टंचाईची!

वाढत्या उन्हासोबत टंचाई उद्रेक धारण करू लागल्याने आणि जलसाठे वेगाने आटू लागल्याने मार्च, एप्रिलमध्ये टंचाईचा भडका उडणार आहे. त्यामुळे प्रशासनासह टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना आगामी काळाची चिंता भेडसावू लागली आहे. येणाऱ्या दिवसांतील पाणीटंचाईला कसे सामोरे जावे, असा प्रश्‍न पडला आहे.

साठवण तलावातून गळती

९० एकराच्या साठवण तलावातून शहराला पाणीपुरवठा होतो. पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून तलावात पाणी घेतले. मात्र, तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून, निम्म्या पाण्याचे बाष्पीभवनामुळे नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागते.

धरणात मुबलक पाणी असल्याने पुढील आवर्तनाचा भरोसा नसल्याने पालिकेने शहराला पुढील आवर्तन येईपर्यंत चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरवासीयांना पाचव्या दिवशी पाणी मिळणार आहे. पालिकेने गळती व अपव्य टाळून पाणी शहरवासीयांना देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

"अर्ध्यावर जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयानक आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यात उपाययोजना व मदत देऊन दिलासा द्यावा. टँकरची संख्या दिवसागणित वाढत असल्याने आगामी टंचाईची तीव्रता गृहीत धरून आतापासूनच प्रभावी उपाययोजना कराव्यात. टँकरचे प्रस्ताव येताच तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा."

-कुणाल दराडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

"मागील वर्षी एप्रिलमध्ये सुरू झालेले टँकर अद्याप सुरूच आहेत. पावसाळ्यात काहीशी संख्या कमी झाली. मात्र, पुन्हा टंचाईग्रस्त वाडे व गावांची संख्या वाढत आहे. ८ फेब्रुवारीला १२ ठिकाणी टँकर मंजूर केले आहे. प्रशासनाकडे टँकरचे प्रस्ताव प्राप्त होताच तहसीलदार व गटविकासाधिकाऱ्यांमार्फत पाहणी करून तत्काळ टँकर मंजूर केले जातात."

-रफिक शेख, पाणीपुरवठा प्रमुख, पंचायत समिती, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui murder case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतरही 'त्याचं' समाधान झालं नव्हतं; चक्क लीलावतीमध्ये...

Nagpur Accident: काॅंग्रेस नेते नितीन राऊत अपघातात बालंबाल बचावले, कारला ट्रकने धडक दिली अन्....

Mumbai Crime: गोराई बीचवरील हत्येचा उलगडा; मृतदेहाचे केले होते सात तुकडे, हातावरील टॅटूमुळे पटली ओळख

Children's Day Special Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चवदार रोटी पिझ्झा, सोपी आहे रेसिपी

Mumbai Police : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; रायचूरमधून गीतकाराला अटक

SCROLL FOR NEXT