pediatricians esakal
नाशिक

Nashik News : बालरोग तज्ज्ञांची ‘नाशिकॉन’ शनिवारपासून; राज्यस्तरीय परिषदेत सहाशे डॉक्टरांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आधुनिक, प्रगत उपचार पद्धतींवर विचारमंथन व ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक्सतर्फे राज्यस्तरीय परिषद ‘नाशिकॉन २०२४’ चे आयोजन केले आहे. शनिवार (ता. ६), रविवारी (ता.७) हॉटेल एक्स्प्रेस इन येथे ही परिषद होईल. याबाबतची माहिती इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक्स नाशिकचे अध्यक्ष डॉ.सचिन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (600 doctors participated in state level conference of pediatricians)

यंदा या परिषदेचे आठवे वर्ष असून सुमारे सहाशेहून अधिक बालरोगतज्ञ परिषदेत ऑनलाइन, ऑफलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत. नाशिकॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद भरडीया म्हणाले, की लसीकरण, नवजात अर्भकांच्या समस्या, ग्रामीण भागातील कुपोषण, अॅलर्जी, तातडीच्या शस्त्रक्रिया, मुलांमधील डोकेदुखी, अस्थमा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय डॉक्टरांसाठी कायद्याचे मार्गदर्शनदेखील होईल.

परिषदेचे उद्‌घाटन शनिवारी (ता. ६) सकाळी आकाराला इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक्सच्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष डॉ. अतुल कुलकर्णी यांची हस्ते होईल. तत्पूर्वी शुक्रवारी (ता. ५) डॉक्टरांसाठी डॉ .वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दिवसभर तिन विविध कार्यशाळांचे होतील. नवजात अर्भकांची काळजी व उपचार, लहान मुलांचा कृत्रिम श्वासोश्‍वास व ईसीजी, ईईजी व रक्ततपासणी या विषयावर कार्यशाळा होतील. कार्यशाळेचे उद्‌घाटन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते होईल. (latest marathi news)

‘लव यू जिंदगी’ सांस्कृतिक कार्यक्रम

डॉक्टरांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी परिषदेदरम्यान ‘लव यू जिंदगी’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. फिटनेस विषयक विविध ऑनलाइन स्पर्धा होतील. परिषदेला महाराष्ट्र बालरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष रामगोपाल चेजारा, सरचिटणीस डॉ. अमोल पवार, कोषाध्यक्ष डॉ. मोहन वारके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

परिषद यशस्वी होण्यासाठी बालरोगतज्ज्ञ संघटना नाशिकचे सचिव डॉ. सचिन पाटील, सहसचिव डॉ. सोनाली पारधी, कोषाध्यक्ष डॉ. प्राची बिरारी, तसेच नाशिकॉन संयोजन समिती सचिव डॉ. पवन देवरे, डॉ. प्रवीण काळे, डॉ. अमोल मुरकुटे, डॉ. वैशाली भरडीया, डॉ. नितीन मेहरकरकर, डॉ. दीपा जोशी, डॉ. राहुल कोपीकर, डॉ. गौरव नेरकर, डॉ. अतुल बोंडे, डॉ. दीपश्री ततार, डॉ. अरुण गचाळे, डॉ. दिनेश ठाकूर, डॉ. ममता अग्रवाल, डॉ. सागर सोनावणे, डॉ. शीतल पगार, डॉ. प्रीतिश देवरे, डॉ. राहुल पाटील आदी विशेष परिश्रम घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT