A fleet of new vehicles newly introduced for the City Police Commissionerate. esakal
नाशिक

Nashik News : शहर पोलिसांसाठी नवीन ‘ताफा’! थारसह 66 चारचाकी; 62 दुचाक्या

Nashik : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गस्तीसाठी वाहनांची गरज भासते. तसेच येत्या वर्षभरात सततच्या निवडणूका आणि त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळा यासाठी तेज-तर्रार वाहनांची गरज भासणार होती.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गस्तीसाठी वाहनांची गरज भासते. तसेच येत्या वर्षभरात सततच्या निवडणूका आणि त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळा यासाठी तेज-तर्रार वाहनांची गरज भासणार होती. त्या पाश्र्वभूमीवर शहर पोलिसांच्या वाहन ताफ्यात नव्याने थारसह ६६ विविध कंपन्यांच्या चारचाकी वाहनांसह ६२ दुचाक्याही सामील झाल्या आहेत. यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या व्हीआयपी पायलिंगसह शहरातील गस्तीला ‘वेग’ मिळणार आहे. ()

शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहन ताफ्यामधील अर्धेअधिक वाहने कामावर आलेली आहे. ही वाहने शहरातील गस्तीवर वापरताना वेळेत पोहोचू शकत नाहीत. चांगली वाहने व्हीव्हीआयपींच्या पायलटींगमध्ये वापरली जातात. तर काही वाहने वरिष्ठ अधिकार्यांना असतात. त्यामुळे पोलिस ठाण्यांकडे गस्तीसाठी जुनीच वाहने असतात. या वाहनांना वेगाची मर्यादा पडत असल्याने वेळेत गस्तीही होत नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले तर काही वाहने कधी बंद पडतील याचा काही नेमही नसायचा.

यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नव्याने वाहनांची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नवीन वाहनांचा ताफा आता शहर पोलिसांच्या ताफ्यात सामील होणार आहे. यामुळे शहर पोलिसाच्या कामाला वेग मिळणार तर आहेच, शिवाय गस्तीचा ‘टायमिंग’ही साधला जाणार आहे. (latest marathi news)

‘डायल ११२‘, दामिनींची सज्जता

पोलीस आयुक्तालय हद्दीतील डायल ११२ चा टायमिंग ५ ते ७ मिनिटांपर्यंत पोहोचला आहे. तो आणखी कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहे. नवीन वाहने डायल ११२ला मिळाल्यास हा टायमिंग ३ ते ४ मिनिटांवर येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस ठाणेनिहाय दामिनी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या दामिनी पथकाच्या हाती नवीन होंडा शाईन व ज्युपिटर मोपेड वाहन मिळल्यास त्यांचीही गस्ती वाढण्यास मदत होणार आहे.

वाहनांचा नवीन ताफा

- बोलेरो : ४०

- निओ बोलेरो : १२

- स्कॉर्पिओ : १०

- थार : ०१

- इनोव्हा : ०२

- XUV 700 : ०१

- होंन्डा शाईन दुचाकी : ६२

- ज्युपिटर मोपेड : २५

वाहनांमुळे फायदाच

लोकसभेनंतर विधानसभा आणि पाठोपाठ महापालिकेच्या निवडणूका होत आहेत. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास घटनास्थळी तात्काळ पोहोचण्यासाठी पोलीसांच्या ताफ्यात वेगवान व सुस्थितीतील वाहनांची आवश्यकता असते. नव्याने वाहने दाखल झाल्याने पोलिसांना त्याचा लाभच होणार आहे.

''शहर पोलिस आयुक्तालयासाठी नवीन वाहनांची मागणी केली होती. त्यानुसार नवीन वाहने दाखल झालेली आहे. लवकरच ती गरजेनुसार दिली जातील. यामुळे शहर पोलिसांचा वाहन ताफा अधिक सज्ज होण्यास मदत होणार आहे.''-चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, मुख्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT