Nashik News : जिल्हा परिषदेच्या सुपर फिफ्टी उपक्रमांतर्गत सलग दोन वर्षांच्या निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमानंतर ५० विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण होऊन या विद्यार्थ्यांनी २६ मेस जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा दिली होती. यापैकी सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये पाच मुली व दोन मुलांचा समावेश आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पालकमंत्री दादा भुसे, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिनंदन केले. (7 students from Zilla Parishad Super Fifty passed JEE Advanced exam)
जिल्हा परिषदेतर्फे २०२२ मध्ये ‘सुपर ५०’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत २०२२ ते २०२४ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थ्यांना जेईई, सीईटी व जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षांसाठी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात आले. ‘सुपर ५०’ उपक्रम २०२२ च्या बॅचची नुकतीच सांगता झाली.
या बॅचमधील २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण होत जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा दिली होती. यातील अश्विनी बोरसे (AIR ९६८), डिंपल बागूल (AIR १०१०), हर्षदा वाटणे (AIR २२६३), आकांक्षा शेजवळ (AIR २९९३), मंगेश इंपाळ (AIR ३०४२), सागर जाधव (AIR ३०४७), वृषाली वाघमारे (AIR ६१८९) या विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले. (latest marathi news)
यामुळे आता विद्यार्थ्यांचे आयआयटीत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. हे सर्व विद्यार्थी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील असून, काही विद्यार्थ्यांचे आई-वडील मोलमजुरी करतात, तर काही विद्यार्थ्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. घरची परिस्थिती हलाखीची त्यात उच्च शिक्षणाविषयी योग्य मार्गदर्शनाचा अभाव या सगळ्यांवर मात करत ‘सुपर- ५०’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या यशाला गवसणी घातली आहे.
सोमवारी (ता. १०) मित्तल यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत संवाद साधला. गटविकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, गटशिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.