Heavy Rain Crop Damage esakal
नाशिक

Nashik Heavy Rain Crop Damage : जिल्ह्यात 5 दिवसात 714 हेक्टरला तडाखा; परतीच्या पावसाने दाणादाण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : परतीच्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी (ता.२६) व शुक्रवारी (ता.२७) जिल्ह्यातील ६३० हेक्टरवरील मका, भात, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याच्या दोन दिवस आधी इगतपुरी आणि नांदगाव तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांचे जवळपास ८४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. म्हणजे पाच दिवसात जवळपास ७१४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबरमध्ये मालेगाव, दिंडोरी व सिन्नर या तीन तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान केले. (714 hectares were destroyed in 5 days in district due to heavy rain )

यात मालेगाव तालुक्यातील एकाच गावात ६७० शेतकऱ्यांच्या मका पिकांचे ५७० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. २० हेक्टर कांदा पीक वाया गेले. दिंडोरी तालुक्यातील चार गावातील ६ शेतकऱ्यांच्या २.२० हेक्टर भात क्षेत्राचे नुकसान झाले. सिन्नर तालुक्यातही ५ गावांमध्ये ३४ शेतकऱ्यांना या परतीच्या पावसाचा फटका सहन करावा लागला. (latest marathi news)

जिल्ह्यातील काही भागात काढणीसाठी आलेले लाल कांद्याचे पिकामध्ये देखील पाणी साचल्याने पिके खराब होण्याचा धोका आहे. लागवड केलेले कांदे खराब होत असून, येत्या काही महिन्यांत उत्पादन कमी होण्याची शेतकऱ्यांकडून भीती दर्शवली जात आहे. त्याचप्रमाणे काढणीनंतर शेतात उरलेल्या सोयाबीनचेही नुकसान होत असून, काढणी न झालेली पिके पावसाचा जोर कायम राहिल्यास काळी पडण्याचाही धोका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: निकाल त्यांच्या बाजूने लागत नाही तेव्हा... निवडणूक जाहीर होताच एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा, काय म्हणाले?

Priyanka Gandhi: अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; वायनाडची जागा काँग्रेस राखणार का?

Baba Siddique Murder Case : वरातीत हवेत गोळीबार हाच मारेकऱ्याचा अनुभव... बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Chennai Flood : चेन्नईला पावसाने झोडपले! शाळा महाविद्यालयांना सुटी; मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

Sports News on 15th October 2024: भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात ते कोल्हापूरच्या कन्येने जिंकले रौप्यपदक

SCROLL FOR NEXT