NMC News esakal
नाशिक

NMC News : नाशिक महापालिकेचे 8 विभागीय कार्यालये! सिडको, पंचवटी विभागाचे होणार विभाजन

Nashik New : शहराचा विस्तार होत असल्याने महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेवरचा ताण वाढत असून, नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविताना प्रशासनाची दमछाक होते

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहराचा विस्तार होत असल्याने महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेवरचा ताण वाढत असून, नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविताना प्रशासनाची दमछाक होते. दुसरीकडे समस्या सुटत नसल्याने नागरिकांनादेखील मानसिक ताणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शहरात दोन विभाग नव्याने निर्माण केले जाणार आहे.

यात महापालिकेच्या सर्वात मोठा असलेल्या पंचवटी विभागाचे विभाजन करून नांदूर- दसक, तर सिडको विभागाचे विभाजन करून पाथर्डी विभागीय कार्यालयांची नव्याने निर्मिती केली जाणार आहे. महापालिका निवडणुकांनंतर महासभा गठित होईल. महासभेच्या मंजुरीनंतर शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल. त्यापूर्वी प्रशासनाकडून दोन विभागीय कार्यालये निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (Nashik 8 Divisional Offices of NMC marahti news)

पूर्वी जुने नाशिक, पंचवटी, नाशिक रोड, सिडको, सातपूर या गावठाण भागापुरती नागरी वसाहत मर्यादित होती. परंतु औद्योगीकरण, लोकसंख्येच्या वाढीमुळे शहराचा विस्तार वाढत गेला. उपनगरांमधील लोक व घरांची संख्या वाढत गेली. सध्या लोकसंख्या २२ लाखांच्या घरात आहे तर घरे व अन्य मिळकतींची संख्या साडेपाच लाखांच्या आसपास आहे.

यावरून शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याचे दिसून येते. एकीकडे शहर वाढत असताना रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती, शिक्षण व आरोग्य व्यवस्था या प्रकारच्या पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या महापालिकेची कर्मचारी व अन्य साधन सामुग्रीवर मर्यादा आल्या आहेत.

महापालिकेत मुख्यालय प्रमुख नियंत्रण केंद्र आहे. त्यानंतर सेवांचा विस्तार पूर्व, पश्‍चिम, सातपूर, सिडको, पंचवटी, नाशिक रोड या सहा विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून होतो. पूर्व व पश्‍चिम विभागाला वाढण्यास मर्यादा आहे. सातपूरचा विकास कारखान्यांच्या भोवती असलेल्या नगरामध्ये होत आहे.

नववसाहतींचा समावेश

पंचवटी विभाग सर्वात मोठा आहे. पंचवटी विभाग आडगाव, नांदूरपर्यंत विस्तारला आहे. आडगाव, नांदूर, औरंगाबाद नाका, विडी कामगारनगर या भागासाठी स्वतंत्र विभागीय कार्यालयाची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर सिडको विभागातील मुंबई- आग्रा महामार्गाच्या पलिकडे पाथर्डी गावापर्यंत सिडको विभागीय कार्यालयाचा विस्तार आहे.

परंतु सेवा-सुविधा पुरविताना दमछाक होते. हा भाग नव्याने विकसित होत असून लोकसंख्या झपाट्याने वाढतं आहे. वाढत्या लोकसंख्येला सेवा देण्यासाठी पाथर्डी हा नवीन विभाग स्थापन करण्याचे नियोजन आहे. यात पाथर्डी- वडाळा रोडवरील नववसाहतींचा समावेश केला जाणार आहे. (Latest Marathi News)

नवीन आकृतिबंध मंजुरीनंतर कारवाई

शहराचा विस्तार वाढत असताना महापालिकेत कर्मचारी वर्गाच्या जागा रिक्त होत आहे. रिक्त जागांची भरती आस्थापना खर्च वाढल्याने होवू शकत नाही. रिक्त पदांची संख्या ३,३१४ वर पोचली आहे. महापालिकेला ‘ब’ वर्ग मिळाल्याने नवीन आकृतिबंध मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे.

महासभेने ९०१६ पदांचा एकत्रित प्रस्ताव नुकताच मंजूर केला. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पंचवटी व सिडको विभागीय कार्यालयांचे नांदूर व पाथर्डी या विभागीय कार्यालयांमध्ये विभाजन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहराच्या लोकसंख्या वाढीचा वेग

वर्ष लोकसंख्या टक्के

१९११ ३०,०९८ ४०.६

१९५१ ९७,०४२ ८५.२४

१९७१ १,७६,०९१ ३५.१०

१९९१ ६,५६,९२५ ५०.३३

२००१ १०,७७,२३६ ६३.९८

२०११ १४,८६,०५३ ३७.९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT