Jal Jeevan Scheme  esakal
नाशिक

Jal Jeevan Scheme : जलजीवन योजनेत निफाड तालुक्यातील 82 गावे पाणीदार

एस.डी.आहिरे

पिंपळगाव बसवंत : जलस्रोतांचे वरदान असलेल्या निफाड तालुक्यात ६८ कोटी रुपये खर्च करून ९५ गावांमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी योजना राबविण्यात आली. त्यातील ८२ गावे पाणीदार झाली असून उर्वरित १३ गावांतील योजना प्रगतिपथावर आहे. पाणी टंचाईग्रस्त गावे जलजीवन मिशन योजनेमुळे पाण्याखाली आल्याने जलजीवन योजना वरदान ठरली आहे. (82 villages of Niphad taluka irrigated under Jal Jeevan Yojan)

शासकीय योजनेबाबत ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी एकोप्याने काम केले तर त्यातून प्रश्‍न मार्गी लागतो हे निफाड तालुक्यात प्रभावीपणे राबविलेल्या जलजीवन योजनेतून अधोरेखित होते. जलस्रोत असूनही निफाड तालुक्यातील बहुतांश गावांत पाणी टंचाईच्या झळा उन्हाळ्यात तीव्र होत.

केंद्र व राज्य शासनाचा सहभाग असलेली जलजीवन योजना टंचाईग्रस्त गावांच्या पथ्यावरच पडली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार व आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नातून तब्बल ९५ गावांत योजनेसाठी ६८ कोटीचा निधी मंजूर झाला. वर्षभरात ८३ गावात जलजीवन मिशनमुळे डोक्यावर हंडे घेऊन करावी लागणारी भटकंती थांबून दारात आलेल्या नळातून पाण्याचा खळखळाट सुरु आहे.

आदिवासी वाड्यावरही पाणी

नांदुर्डी येथील आदिवासी वस्तीसाठी ही योजना कार्यान्वित झाल्याने महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली आहे. नांदुर्डीसाठी सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या जलउद्भवातून ही योजना कार्यान्वित झाली. (latest marathi news)

नांदुर्डीसह देवगाव, नांदूर मध्यमेश्‍वर, सारोळे खुर्द, सायखेडा, पिंपळगाव निपाणी, कोळगाव, खेडलेझुंगे, दात्याणे, शिंपी टाकळी, पिंप्री यासह ८३ गावांतील नागरिकांची तहान भागविली जात आहे. जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या विहिरींना अद्याप पावसाअभावी पाणी नसल्याने कोरड्या आहेत. तेथे अद्याप पाणीपुरवठा सुरू होऊ शकला नाही.

१३ गावांची कामे प्रगतिपथावर

"तालुक्यातील सोनेवाडी, सावरगांव, उगांव, वनसगांव, तामसवाडी, कानळद, पाचोरे, पंचकेश्‍वक, देवपूर यासह १३ गावांची कामे लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहे.तेथे येत्या चार महिन्यात योजना कार्यान्वित होईल. ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून निफाड मतदारसंघासाठी जगजीवन मिशनच्या सर्वाधीक योजना मंजुर करून घेतल्या. बहुतांश गावांत कार्यान्वित झाल्या असून पाणी टंचाई दूर झाली आहे." - आमदार दिलीप बनकर

"८२ गावांत जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण झाल्याने तेथील पाणी प्रश्‍न मिटला आहे.१३ गावांत ही योजना अंतिम टप्प्यात आहे. जलजीवनमुळे मुबलक व शुध्द पाणी पुरवठा होत आहे."-ए.पी.बिन्नर (शाखा अभियंता,पंचायत समिती,निफाड).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT