heavy rain damage crop farmer esakal
नाशिक

Nashik Heavy Rain Damage: परतीच्या पावसाचा 84 हेक्टरला तडाखा! कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज; मका, भात अन कांद्याचे सर्वाधिक नुकसान

Latest Nashik Rain Update News : २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसामुळे ८४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यात मका, भात व कांदा पिकाची मोठी हानी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Heavy Rain Damage : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. या पावसाचा जिल्ह्याच्या विविध भागांत खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

यातच, नांदगाव व इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली असून, याच दोन तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसामुळे ८४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यात मका, भात व कांदा पिकाची मोठी हानी झाली आहे. (Nashik 84 Hectares damage by Return Rain)

यंदा जिल्ह्यात सरासरी ९६.०३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणेदेखील ओव्हरफ्लो झाली आहेत. चांगल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके जोरात आहेत. मका, सोयाबीन यांची लागवड वाढली आहे. सरासरी १०५ टक्के पेरण्या झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.

खरीप हंगामातील पिके आता काढणीला आली असून, काही ठिकाणी कापणी सुरू झाली आहे. मात्र, यातच परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. गेल्या पाच दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने मका, सोयाबीन, बाजरी या पिकांचे प्रमुख नुकसान झाले आहे.

याशिवाय अनेक भागांत कांदालागवडी पाण्याखाली गेल्याने त्या खराब झाल्या आहेत. अनेक ठिकाणी रब्बी कांदा रोपवाटिका तयार झाल्या असताना पाण्याच्या प्रवाहामुळे रोप व बियाणे वाहून गेल्याने नुकसान वाढलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार नुकसान झालेल्या नांदगाव तालुक्यामध्ये आठ गावांत १८२, तर इगतपुरी तालुक्यातील एका गावात १२४ शेतकरी अशा नऊ गावांमध्ये हे नुकसान असून, ३०६ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.

नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील न्यायडोंगरी महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या परिसरात काही शेतकऱ्यांची कांदा रोपवाटिका वाहून गेल्याने त्यांना आगामी कांदालागवडीला अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे दुबार रोपवाटिका निर्मितीची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढविली आहे.

नुकसानीचे पंचनामे करावेत

अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली नाही. मात्र पावसामुळे नुकसान आहे. तेथेही पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. येवला तालुक्यातील पाटोदा महसूल मंडळात अनेक ठिकाणी मका भुईसपाट झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मालेगाव तालुक्यात खरिपातील बाजरी, मका व हिरवा चारा याला वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. माळमाथ्यासह सर्वच भागांत कपाशी व मका पिकाचे नुकसान झाले आहे. (latest marathi news)

कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार झालेले नुकसान

पीक नुकसान (हेक्टर)

मका ४०

भात २५

कांदा १५

कांदा रोपवाटिका ४

एकूण ८४

गंगापूरसह १२ धरणांमधून विसर्ग

शुक्रवारी (ता. २७) सकाळी गंगापूर धरणातून एक हजार १६९ क्यूसेकचा विसर्ग करण्यात आला. याशिवाय दारणा २,००४, कडवा १,६६०, भाम १,१२०, वालदेवी ३०, आळंदी ३०, भावली १३५, वाघाड २२९, वाकी ११६, नांदूरमध्यमेश्वर बंधारा १५,२४८, कश्यपी ३२०, करंजवण ६०२ क्यूसेकचा विसर्ग करण्यात आल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर मोठी घटना! सुमारे 40-50 फूट खोलवर लागली आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT