Nidhu Saxena, MD & CEO of Bank of Maharashtra, Vivek Joshi, Secretary, Financial Services, presenting the dividend check to Finance Minister Nirmala Sitharaman. esakal
नाशिक

Nashik News : बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे 857 कोटीचा लाभांश सादर; अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडे धनादेश सुपूर्द

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे वित्तीय वर्ष २०२१-२४ साठी घोषित केलेला ८५७.१६ कोटी रकमेचा लाभांशाचा धनादेश अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सादर करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना यांनी धनादेश सुपूर्द केला. (857 crore dividend presented by Bank of Maharashtra Cheque handed over to Finance Minister Sitharaman)

यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडे, बँकेच्या एनबीसीए व्हर्टिकलच्या प्रभारी श्रीमती संतोष दुलार, केंद्राच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे वित्तीय वर्ष २०२४ साठी प्रत्येक समभागामागे १.४० रुपये (१४ टक्के) लाभांश घोषित करण्यात आला होता. सदर लाभांश प्रदानामुळे गत वित्तीय वर्षातील बँक ऑफ महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी प्रतिबिंबित होते.

२०२३ मधील २६०२ कोटी निव्वळ नफ्याच्या तुलनेत २०२४ मध्ये बँकेच्या निव्वळ नफ्यात ५५.८४ टक्के वाढ होऊन बँकेने ४०५५ कोटी एवढा निव्वळ नफा कमावला आहे. बँक सातत्याने सर्वोत्तम कामगिरीची नोंद करीत असून, एकूण व्यवसाय व ठेवी संकलनात बँकेने सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील सर्व बँकांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. (latest marathi news)

वित्तीय वर्ष २०२३-२४ मध्ये बँकेने आपल्या एकूण व्यवसायात १५.९४ टक्के तर ठेवी संकलनात १५.६६ टक्के वाढ नोंदविली आहे. दर वर्षातील लक्षवेधक वित्तीय कामगिरीमुळे बँकिंग क्षेत्रातील एक मजबूत बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राने आपली जागा अधिक मजबूत झाल्याचे दाखवून दिले आहे. बाजारपेठेतील सातत्याने बदलत असलेल्या परिस्थितीशी सानुकुलीत करण्याची लवचिकता सातत्याने दर्शवून बँकेने सेवांचे वितरण आणि ग्राहकांचे समाधान याबाबत बँकेने आघाडी घेतली आहे.

बँकिंग प्रणालीवर लक्ष

बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्वोत्तम कामगिरीत बँकेच्या कर्मचाऱ्यांचे परिश्रम प्रयत्न व समर्पित वृत्ती योग्य वेळी महत्त्वपूर्ण परीचलनात्मक निर्णय घेतल्यामुळे ते सर्वोत्तम कामगिरीत प्रतिबिंबित झाले आहेत. डिजिटल तंत्र व अधिक सुलभ ग्राहक स्नेही बँकिंग प्रणालीवर लक्ष केंद्रित केल्याने बँकेला निव्वळ नफा व वाढीची हा प्रक्षेपमार्ग कायम ठेवण्यात यश प्राप्त झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT