money esakal
नाशिक

Nashik News: रोजगार हमीला मजुरीची ‘नो गॅरंटी’; राज्यात 34 जिल्ह्यांतील अकुशल मजुरीचे 893 कोटी रुपये केंद्राकडे थकीत

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे ः सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील मजुरीचे पैसेच मिळत नसल्याने योजनेची विश्‍वासार्हता कमी झाली आहे. शंभर दिवसांच्या आतील मजुरीची हमी केंद्र सरकारने घेतलेली असताना राज्याच्या ३४ जिल्ह्यांमधील मजुरांचे तब्बल ८९३ कोटी रुपये केंद्राने थकविले आहेत. यामुळे मजुरीचे दर वाढवूनही कामासाठी मजूर मिळत नसल्याने अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावागावांत ६०-४० या प्रमाणात कुशल (स्कील्ड) व अकुशल (अनस्कील्ड) या स्वरूपात २६२ विविध प्रकारची कामे केली जातात. (893 crore of unskilled labor in 34 districts of state is owed to Centre )

कामासाठी मजुरांना २७३ रुपये रोजाप्रमाणे मजुरी दिली जाते. १ एप्रिल २०२४ पासून या मजुरीत वाढ करून २९७ रुपये करण्यात आली. तरीही राज्यात मजुरांची वाणवा असल्याचे चित्र सध्या दिसून येते. याचे मुख्य कारण खासगी ठिकाणी काम करणाऱ्यांना ४०० ते ५०० रुपये मजुरी मिळते. या तुलनेत शासनाची मजुरी कमी तर आहेच, याशिवाय वेळेवर पैसेही मिळत नाहीत. परिणामी, रोजगार हमीत ‘नो गॅरंटी’वर काम करण्यापेक्षा खासगी कामाकडे मजूर वळले आहेत.

महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील ३७ हजार १४९ कामांचे ८९३ कोटी ६४ लाख रुपये केंद्र सरकारकडे थकीत आहेत. त्यामुळे पाच लाख ५८ हजार ६४८ मजूर अडचणीत आहेत. मजुरी मिळत नसल्याने महात्मा गांधी रोजगार हमी विभागाची कामे अडकली आहेत. अकुशल व कुशल अंतर्गत कामांचा समतोल साधायचा, तर वेळेत पैसेही मिळत नाहीत. त्यात मजुरांची मनधरणी कशी करायची आणि कामे पूर्ण कशी, असा प्रश्‍न रोजगार हमी विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर, बीड, यवतमाळला सर्वाधिक झळ

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विशेषत: उन्हाळ्यात मजुरीची जास्त कामे केली जातात. मराठवाड्यात रोजगार हमीला उत्तम प्रतिसाद मिळतो. त्यामुळे याच विभागातील जिल्ह्यांची सर्वाधिक रक्कमही थकीत असल्याचे दिसून येते. छत्रपती संभाजीनगरचे ९५ कोटी ४२ लाख रुपये, तर बीडचे ७५ कोटी ४० लाख रुपये थकीत आहेत. तसेच विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचे ५७ कोटी ४४ लाख रुपये अकुशलची मजुरी थकली आहे. नाशिक जिल्ह्यात कामांची व मजुरांची संख्या तुलनेत जास्त दिसत असली तरी थकीत रक्कम अवघे २४ कोटी ५४ लाख रुपये आहे. (latest marathi news)

जिल्हानिहाय थकीत रक्कम

जिल्हा.............कामे..........मजूर..........रक्कम (कोटी रु.)

अहमदनगर.......६५६..........५५५१८......१.५६

अकोला............५२२..........८८३२५......१५.८५

अमरावती..........३५७४.......३४३०२०.....५३.८१

बीड................१३२६........४५५३७१......७५.४०

भंडारा..............१३४३........३६२४६४......३७.५५

बुलडाणा...........५७०..........८७६८८........१६.०८

चंद्रपूर...............१२८०.......२८०४११........४०.४३

छत्रपती संभाजीनगर....१२८४.......५५९०४६.......९५.४२

धाराशिव............३५१..........१२५०९६.......२०.५७

धुळे..................६३४...........१०९१६६.......१९.१६

गडचिरोली..........१२९०.........१८६१६७........२९.१३

गोंदिया...........१४२७...........५४७७११........५८.१५

हिंगोली...........३८५.............९४४१०.........१६.५०

जळगाव..........६६२..............७७६४१.........१४.३९

जालना...........१२८४............२४८६२३........४२.३८

कोल्हापूर...........३०१..............२७२३४.........५.४६

लातूर...............१२४९............२४८४४६........४२.०७

नागपूर..............५९१..............९५९३९.........१६.३४

नांदेड................१०१४.............२८२९४८.......४८.८७

नंदुरबार.............३३३...............८९५१७.........१८.७२

नाशिक..............३९१७..............१३२५६८.......२४.५४

पालघर...............१४२४...............१२२२१५......१६.१६

परभणी................८९६................२६८३७४.......४६.२८

पुणे....................१९७६...............२०४३२........३.७८

रायगड................१९०.................५६३१...........१.०८

रत्नागिरी.............२००.................१७९१२.........३.४२

सांगली................२३६१.............२५८७३..........५.१०

सातारा................२६६................३६२५१..........६.४९

सिंधुदुर्ग................३०२................१४८८०..........२.५६

सोलापूर................३६७................५९८८२..........१०.७८

ठाणे.....................१३८७..............१७१२६..........२.९८

वर्धा.....................४३५................६२९३७..........१३.३९

वाशीम............७८५.................१२९२८४........२२.६०

यवतमाळ.........२५६७...............३०२५४२.........५७.४४

एकूण.............३७१४९...............५५८०६४८......८९३.६४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Mains 2023 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; महेश घाटुळे परीक्षेत पहिला, मुलींमध्ये वैष्णवी बावस्कर अव्वल

2024 Pune car crash: पोर्शे कार अपघातानंतर केलेले कारनामे भोवणार; गुन्ह्यांत कलमवाढ! अल्पवयीन आरोपीचा पाय खोलात

'गुड टच अँड बॅड टच' ची कार्यशाळा सुरू होती, तरुणीनं असं काही सांगितलं की पोलिसांना बोलवावं लागलं, काय घडलं?

Kalyaninagar Accident प्रकरणी रक्ताचे नमुने बदलण्यात सहभाग असलेल्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला

जितिया सणादरम्यान मोठी दुर्घटना! 43 जणांचा बुडून मृत्यू, घटनेत 37 मुलांचा समावेश, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT