Seeds esakal
नाशिक

Nashik News : खरीपासाठी मिळणार यंदा मुबलक बियाणे; बियाण्याचे पाकिट 853 ला

Nashik News : २०२४ वर्षात कपाशी लागवडीसाठी एक लाख बी. टी. कॉटन पाकीटे लागणार असून भरपूर प्रमाणात बियाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती उपविभागीय कृषि अधिकारी गोकुळ आहिरे यांनी कळविली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : मालेगाव तालुक्यात गतवर्षी २७ हजार ३३० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. आगामी २०२४ च्या खरीप हंगामात तालुक्यात तेवढीच कपाशीची लागवड अपेक्षीत आहे. कपाशीसाठी साधारणत: एक हेक्टर क्षेत्रासाठी ४७५ ग्रॅम वजनाची ३ बी.टी. कॉटन पाकीटे लागतात. चालू वर्षात कपाशी बियाण्याच्या एक पाकिटाची किंमत ८५३ रुपये इतकी असेल. (Abundant seeds available for Kharif)

२०२४ वर्षात कपाशी लागवडीसाठी एक लाख बी. टी. कॉटन पाकीटे लागणार असून भरपूर प्रमाणात बियाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती उपविभागीय कृषि अधिकारी गोकुळ आहिरे यांनी कळविली आहे. खरीप हंगामात शेंदऱ्या बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रिय पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.

शास्त्रज्ञांच्या मतानुसार कपाशी शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. (latest marathi news)

हंगामपूर्व कपाशी लागवड झाल्यास शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत होण्यासाठी हंगामपूर्व कपाशीची लागवड होणार नाही यादृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लागवड १ जूननंतरच करावी असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी गोकूळ आहिरे व तालुका कृषि अधिकारी बी. बी. गोरडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT