नाशिक : कार चालवत असताना बुटात लेस अडकली असता, पाय अचानक एक्सीलेटरवर पडला आणि भरधाव वेगातील कार रस्त्यालगतच्या पिलरला जाऊन धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातामध्ये गंभीर जखमी कारचालक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सदरची घटना महामार्गावरील द्वारकेच्या पुढे उड्डाणपुलाखाली घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, शहरात वेगवेगळ्या रस्ता अपघातांच्या घटनांमध्ये पाच जण ठार झाले आहेत. (Nashik Accident Car driver killed after collision pillar 5 people died in different accidents)
अश्पाक नजीर शेख (४७, रा. लक्कडकोट, ता. येवला) असे मयत कारचालकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शेख हे गेल्या सोमवारी (ता. १२) रात्री त्यांच्या इको कारने (एमएच ४१ व्ही ५४७४) नाशिककडून येवल्याकडे निघाले होते.
रात्री आठ वाजेच्या सुमारास ते द्वारकाकडून उड्डाणपुलाखालून निघाले होते. याच दरम्यान त्यांच्या बुटात लेस अडकली आणि त्यांच्या एका पायाचा दाब अचानक एक्सीलेटरवर पडला. त्यामुळे कार भरधाव वेगातील पुलाखालील ९६ क्रमांकाच्या पिलरवर जाऊन जोरदार धडकली.
या विचित्र अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
रस्ता अपघातांमध्ये चौघांचा बळी
वडनेर रोडवरील गुरुकृपा लॉन्ससमोर गेल्या मंगळवारी भरधाव वेगातील चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार १७ वर्षीय तरुण ठार झाला. सिराज सगीरआलम अन्सारी (१७, रा. विहितगाव, देवळाली कॅम्प) असे मयत तरुणाचे नाव आहे.
सगीरआलम अन्सारी यांच्या फिर्यादीनुसार एमएच ०३ एआर १७५६च्या कारचालकाविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेमध्ये लाखलगाव येथे दुचाकीवरून पडल्याने गंभीररित्या जखमी झालेले ८६ वर्षीय निवृत्ती हरिभाऊ जाधव ( रा. लाखलगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
गेल्या ५ तारखेला रात्री पावणे नऊच्या सुमारास ते दुचाकीने मळ्याकडे जात असताना अपघात झाला होता. उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले असता, मंगळवारी (ता.१३) ते मयत झाले.
याप्रकरणी आडगाव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर, तिसरी घटना अंबड-लिंकरोडवरील दत्त मंदिरासमोर घडली. यात सतिश भीकन बोरसे (३५, रा. कुणाल रो हाऊस, अशोकनगर, सातपूर) हे गेल्या १० तारखेला दुचाकीने एक्स्लो पॉईटकडून अशोकनगरकडे जात होते.
रात्री साडेनऊच्या सुमारास दत्त मंदिरसमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात होऊन ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, मंगळवारी (ता. १३) त्यांचा मृत्यु झाला.
याप्रकरणी सातपूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. चौथ्या अपघाताच्या घटनेत वयोवृदध सिटी लिंक बसच्या धडकेत ठार झाल्याची घटना घडली. भाऊसाहेब गेणुजी भादेकर (७२, रा. एमएचबी कॉलनी, सातपूर) हे गेल्या मंगळवारी (ता. १३) सकाळी सातच्या सुमारास घराकडून इएसआयसी मैदानाकडे पायी जात होते.
त्यावेळी पाठीमागून आलेल्या सिटी लिंक बसने (एमएच १५ जीव्ही ७७०९) धडक दिली. या अपघातात भाऊसाहेब हे गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यप्रकरणी सातपूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.