Container hits six to seven vehicles at ghat esakal
नाशिक

Nashik Accident News : ब्रेक फेल ट्रेलरची पाच वाहनांना धडक! कसारा घाटात अपघातात 14 प्रवासी जखमी

Nashik Accident : नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात रविवारी (ता. १४) दुपारी झालेल्या भीषण अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर : नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात रविवारी (ता. १४) दुपारी झालेल्या भीषण अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी झाले. कसारा घाटातील ब्रेक पॉइंटजवळ ब्रेक फेल ट्रेलरने पाच गाड्यांना धडक दिली. या भीषण धडकेत पाचही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी झाले. (Nashik Accident News)

घटनास्थळावर महामार्ग पोलिस, रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका रवाना करण्यात आली. सर्व जखमींना नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेचे चालक कैलास गतीर व १०८ रुग्णवाहिकेतून कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना खर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

तीन दिवसांपासून परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून, या पावसामुळे घाटात ठिकठिकाणी धबधबे तयार झाले आहेत. या धबधब्याखाली भिजण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी प्रवासी वाहने मध्येच उभी करून ठेवत असल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. घाटातील ब्रेक पॉइंटजवळ सहा ते सात वाहने रस्त्याने जात असताना ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरने या वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाला.

नवीन कसारा घाटातील धबधबा पॉइंटजवळ रविवारी (ता. १४) दुपारी तीनच्या सुमारास ट्रेलरचे (जीजे- १२-एयू-७१७१) ब्रेक फेल झाल्याने समोर जाणाऱ्या मारुती सियाझ (एमएच-०३-सीएस--४९२९), ह्युंदाई आय १० (एमएच-०५-ईजे-०९३७), किया कार (एमएच-४७-४४११), मारुती बलेनो कार (एमएच-४८-एडब्ल्यू-०४३०) व मारुती स्विफ्ट कारला (एमएच- १५-जीएल-३५५७) धडक देऊन उलटला. (latest marathi news)

या घटनेत विनीत मेहता, दिव्या मेहता, जितेश पिटाडिया, फाल्गुनी पिटाडिया जखमी झाले. तर अन्य तीन जखमींची नावे समजू शकली नाहीत. या प्रकरणी कसारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अपघातग्रस्त कार खासगी क्रेनच्या मदतीने बाजूला करून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

बेशिस्तपणामुळे दुर्घटना

नवीन कसारा घाटात फेसाळणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक या ठिकाणी वाहने थांबवतात किंवा गाडीचा वेग कमी करून फोटो काढत असतात. त्याचबरोबर उंटदरीजवळही मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उभी करून पर्यटक फोटो काढण्यासाठी जातात. त्यामुळे दोन्ही धोक्याच्या ठिकाणी अपघात होतात. टोल कंपनी व पोलिसांनी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: फेड रिझर्व्ह ते डॉलर इंडेक्स...'या' 5 कारणांमुळे शेअर बाजार आणखी कोसळणार; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

SCROLL FOR NEXT