Nashik Accident News : सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाथरे शिवारात रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. (Nashik Accident News 2 bikes collide on Shirdi highway 1 killed Both seriously injured)
शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ असलेल्या डोऱ्हाळे फाट्यावर सचिन राजाराम गुजर रा. धानोरे ता. निफाड व अक्षय पाटीलबा जावळे (25) रा. सोनगाव ता. कोपरगाव हे दोघे पल्सर मोटरसायकल एमएच 15 / एच ए 9006 वरून पाथरे गावाकडून विरुद्ध बाजूला वळत असताना समोरून येणाऱ्या प्लेटिना मोटरसायकल एमएच 15 डीबी 9670 ने त्यांना जोराची धडक दिली.
अक्षय गायकवाड रा. खेडलेझुंगे ता निफाड हा युवक प्लॅटिना गाडी चालवत होता. जोराचा आवाज होऊन दोनही दुचाकी रस्त्यावर पडल्या. अपघाताचा आवाज ऐकून पाथरेचे माजी सरपंच मच्छिंद्र चिने, सामाजिक कार्यकर्ते मनोज गवळी यांचे सह बसस्थानक परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत जखमी अवस्थेतील तिघा युवकांना रस्त्यावरून बाजूला घेतले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पिंपरवाडी येथील टोल नाक्यावरील मदत पथकातील प्रशांत शिंदे, शांताराम शिंदे, रुग्णवाहिका चालक दुर्गेश शिंदे यांनी मदतीला येत तिघा अपघातग्रस्तांना शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या संदर्भ सेवा रुग्णालयात हलवले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच अक्षय जावळे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातातील जखमी सचिन गुजर हा भारतीय सैन्य दलात कार्यरत असून त्याचेसह अक्षय गायकवाड यास गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर अति दक्षता कक्षात तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
अपघाताची माहिती समजल्यावर वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, हवालदार नितीन जगताप यांनी पाथरे व शिर्डी येथे जाऊन जखमींची विचारपूस केली.
या अपघातातील मयत अक्षय जावळे याचा सोनेवाडी गावात लहानसा हॉटेल व्यवसाय आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असून त्याचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्याला चार महिन्यांचा मुलगा आहे. अक्षयची सासुरवाडी जवळच्या चांदेकसारे येथील असल्याने अपघाताची माहिती समजल्यावर चांदेकसारे गावावर शोककळा पसरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.