ओझर : मुंबई आग्रा महामार्गावर ओझर शिवारात अंबिका टेक्सटाइल समोर गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास आमदार सुहास कांदे यांची सामाजिक संस्था असलेल्या देवाज हेल्थ ॲण्ड डेव्हलपर्स नाव असलेल्या रूग्णवाहिकेने एका शासकीय रूग्णवाहिकेसह रस्त्याच्या बाजुला पंचर काढत असलेल्या एका खाजगी वाहनाला जोरदार धडक दिली. (Accident News Ambulance hit and run at Ozar)
सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. दरम्यान धडक दिलेल्या रूग्णवाहिकेचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या बाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी कि मनमाड येथील शासकीय रूग्णवाहिकेचा चालक शांताराम बारकु (देवरे रा. तिसगाव ता. देवळा जि. नाशिक) हे शासकीय रूग्णवाहिकेने (क्र. एम एच १४ सी एल ०३९७) एका रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून परत येत असतांना.
ओझर येथील मुंबई आग्रा महामार्गावरील अंबिका टेक्सटाइल समोर मागुन येणा-या एका खाजगी रूग्णवाहिका (क्र. एम एच १५ एच एच८७९९) हिने जोरदार धडक देत रस्त्याच्या बाजुला स्टेपनी बदलत असणाऱ्या टोयाटो कंपनीची रूमीयान (क्र. एम एच १९ ई एच .४९५०) हिला देखील जोरदार धडक दिली. यातदोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असुन सुदैवाने कोणीही यात गंभीर जखमी झाले नाही. (latest marathi news)
दरम्यान धडक दिलेल्या रूग्णवाहिकेवर आमदार सुहास कांदे यांचे छायाचित्र व देवाज हेल्थ ॲण्ड डेव्हलपर्स असे नाव होते. यातील चालक गौरव देविदास बोरसे (वय २७ रा. नांदगाव. ता. नांदगाव) हा मद्यधुंद अवस्थेत होता.
शांताराम देवरे यांच्या फिर्यादीवरून ओझर पोलीसांनी गौरव बोरसे याच्या विरोधात अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास ओझर पोलीस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.