Onion tractor was hit by speeding sand dumper on Satana-Taharabad road on Sakri-Shirdi national highway, onion scattered on the road, in the second photo, a farmer picking onion. esakal
नाशिक

Nashik Accident News : डंपरने कांद्याच्या ट्रॅक्टरला 200 फूट फरफटत नेले; ताहाराबाद रस्त्यावर अपघात

Nashik Accident : साक्री- शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा शहरानजीक ताहाराबाद रस्त्यावर शुक्रवारी (ता.५) पहाटे साडेपाचच्या सुमारा, हॉटेल दुर्गाजवळ भरधाव वाळूच्या डंपरने कांदा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना जबरदस्त धडक दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : साक्री- शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा शहरानजीक ताहाराबाद रस्त्यावर शुक्रवारी (ता.५) पहाटे साडेपाचच्या सुमारा, हॉटेल दुर्गाजवळ भरधाव वाळूच्या डंपरने कांदा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना जबरदस्त धडक दिली. या धडकेत एक ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सटाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (nashik Accident on Taharabad road of dumper and onion tractor marathi news)

अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र कांद्याच्या खच पडला होता. मदत करण्याऐवजी काही नागरिक मात्र रस्त्यावर पडलेला कांदा गोळा करण्यात व्यस्त होते. ताहाराबादकडून सटाणामार्गे देवळ्याच्या दिशेने वाळूचे डंपर (एम.एच.४६ बी.एफ.०६९३) भरधाव जात होते. पहाटे साडेपाचच्या दरम्यान सटाणा शहराजवळील यशवंतनगरलगत हॉटेल दुर्गाजवळ निताणे (ता. बागलाण) येथील शेतकरी प्रभाकर खंडू पवार हे दोन ट्रॅक्टरमधून देवळा येथे विक्रीसाठी कांदा घेऊन जात होते.

याचवेळी मागून येणाऱ्या वाळूच्या डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात कांद्याच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती, की कांद्याचे ट्रॅक्टर तब्बल २०० फूट फरफटत गेले आणि हॉटेल दुर्गाच्या संरक्षक भिंत तोडून आतमध्ये गेले. ट्रॅक्टर तेथील विद्युत डीपीला धडकला असता तर मोठा अपघात झाला असता.

दुसऱ्या कांद्याच्या ट्रॅक्टरला सुद्धा डंपरने अशीच जोरात धडक दिल्याने ते रस्त्यावरच पलटी झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातात प्रभाकर खंडू पवार हे चालक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सटाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या डंपर चालकाने याच महिन्यात तीन वेळा अपघात केल्याची चर्चा आहे.

घटनेची माहिती मिळताच सटाणा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंग राजपूत, पोलिस हवालदार रायसिंग जाधव, पोलिस भूषण सूर्यवंशी व कमलाकर पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा विक्रीसाठी नेत असताना रस्त्यावर पडल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT