gaurav ugale  esakal
नाशिक

Nashik Accident : बारागाव पिंप्री येथील एकाचा अपघाती मृत्यू

Nashik Accident : मनेगाव (ता. सिन्नर) येथे नाशिक पुणे महामार्गावर स्विफ्ट कार अपघातात बारागाव पिंप्रीच्या होतकरू युवकाचा मृत्यू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वडांगळी : मनेगाव (ता. सिन्नर) येथे नाशिक पुणे महामार्गावर स्विफ्ट कार अपघातात बारागाव पिंप्रीच्या होतकरू युवकाचा मृत्यू झाला आहे. संगमनेरहून सिन्नरकडे स्विफ्ट कारने (एमएच १४, टीएस ६७४४) गौरव शंकर उगले (२७ ) घराकडे परतत असताना गुरुवारी (ता.१०) रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. कार गतिरोधकाजवळ स्लीप झाल्याने तीन- चार वेळा पलटी होऊन रस्त्याच्याकडील नाल्यात पलटी झाली. (Accidental death of one in Baragaon Pimpri at highway )

त्यात चालक गौरवच्या डोक्याला गंभीर मार लागला. सोबत असलेला सहकारी जखमी झाला आहे. सिन्नरला खासगी दवाखान्यात नेण्यापूर्वीच गौरवचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले. गौरव शेती व्यवसाय सांभाळून हौसिंग कर्ज प्रकरणाची कामे करत होता. वडील शंकर उगले विहिरीसाठी बोअरवेलचे काम करतात. तो त्यांचा एकुलता मुलगा होता. होतकरू युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बारागांवपिंप्री येथे सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

SCROLL FOR NEXT