A four-wheeler towed by the city transport department. esakal
नाशिक

Nashik City Transport : शहरात पुन्हा ‘टोईंग’ सुरू; बेशिस्तांना बसणार दणका

Nashik News : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या वर्षभरापासून नो-पार्किंग व वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांची टोईंग बंद होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या वर्षभरापासून नो-पार्किंग व वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांची टोईंग बंद होती. मात्र महाराष्ट्र दिनापासून (ता.१) पुन्हा टोईंग सुरू केली असून, बेशिस्त वाहनचालकांना दणका बसणार आहे. (Nashik Action against unruly drivers started again from Maharashtra Day)

दरम्यान, वर्षभरात नवीन ठेकेदार नेमण्याच्या प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर जुन्याच ठेकेदारास पुढील आदेशापर्यंत टोईंग करण्यास परवानगी दिली. मात्र, टोईंग सुरू करताना शहरातील पार्किंगच्या ठिकाणी पट्टे, फलक नसल्याने पुन्हा टोईंगवरून वाहनचालक-पोलिस आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

गेल्या १५ मार्च २०२३ पासून शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये टोईंग बंद होते. जुलै २०२३ मध्ये एका दिवसांसाठी टोईंग सुरू करून दुसऱ्याच दिवशी त्यास स्थगिती देण्यात आली होती. तेव्हापासून नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु या प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर जुन्या ठेकेदारास पुन्हा टोईंगचा ठेका वाहतूक शाखेतर्फे देण्यात आला आहे.

पुढील आदेशापर्यंत ही मुदतवाढ असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, आयुक्तालय हद्दीत बुधवारपासून (ता. १) बेशिस्त वाहने, नो पार्किंगमधील वाहने, वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहनांच्या टोईंग सुरू केली आहे. मात्र टोईंग सुरू करताना वाहतूक शाखा व महापालिकाच्यावतीने शहरातील पार्किंग-नो पार्किंगची ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी पांढरे-पिवळे पट्टे मारून मार्किंग करणे आवश्यक होते. (Latest Marathi News)

तसेच नो-पार्किंगचे फलक लावणेही आवश्यक असताना तसे कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी स्मार्ट पार्किंग केली गेली, परंतु त्यांचा वापर झाला नाही. तर ज्या ठिकाणी पार्किंगसाठी पट्टे आखले ते आता पुसट झाले तर काही ठिकाणी नाहीसे झाले आहेत. त्यामुळे वाहनांच्या टोईंग केल्यानंतर या मुद्यावरून वाहतूक पोलिस व वाहनचालक यांच्यात वादाच्या ठिगण्या उडणार आहेत.

- अनेक ठिकाणी नो-पार्किंगचे फलक नाहीत

- स्मार्ट पार्किंगचा वापर होत नाही

- पार्किंगसाठी आखलेले पट्टे पुसट; काही ठिकाणी नाहीसे

"शहर वाहतूक शाखेतर्फे नो-पार्किंग, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोईंग सुरू करण्यात आलेली आहे. तरी वाहनचालकांनी वाहन पार्क करताना काळजी घ्यावी." - दिवाणसिंग वसावे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT