पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहरात सध्या सर्वांत कळीचा मुद्दा तो वाहतूक कोंडीचा आहे. निफाड फाटा परिसरातील बाजारपेठत व्यवसायिकांकडून होणारी अतिक्रमणे, नागरिकांकडून वाहनांची बेशिस्त पार्किंग वाहतूक कोंडीचे कारण असल्याचे समोर आले आहे.
याविरोधात पिंपळगाव पोलिस प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. बाजारपेठेतील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर हातोडा मारण्याबरोबरच बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाईचा धडका पोलिसांनी लावला आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे. (Nashik Pimpalgaon Police administration action solve traffic jam marathi news)
वाहतूक कोंडीने निफाड फाटा परिसरातील जुना महामार्ग, निफाड रस्ता, मेन रोड आदी ठिकाण व्यवसायिक व नागरिक त्रस्त असतात. निफाड फाट्यावर तर ठराविक कालावधीत वाहतुकीचा मेगा ब्लॉक असतो. यातून कर्कस हॉर्नचा आवाज, किरकोळ अपघात, वाहनचालकांमध्ये वाद हे नित्याचे बनले आहे. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सरपंच भास्करराव बनकर यांनी चार वाहतूक सुरक्षारक्षकांची नेमणूक केली, पण बेशिस्तीमुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजतच आहेत.
अखेर पिंपळगावचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी विशेष पथक नेमून अतिक्रमण हटविण्याबरोबरच बेशिस्त पार्किंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा धडका लावला आहे. दोन दिवसांत निफाड फाटा परिसरातील अतिक्रमित सात दुकाने हटविली, तर २५ हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांची ही कारवाई पुढील तीन ते चार दिवस चालणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.