The team confiscating plastic bags from a businessman's shop at Dood Bazar. esakal
नाशिक

Nashik Plastic Ban : शहरात मनपातर्फे प्लास्टिक पिशवी जप्तीची कारवाई! 10 किलो प्लास्टिक जप्त

Nashik News : परिसरातील दूध बाजार ते फाळके रोड विविध प्रकारच्या व्यावसायिकांवर प्लास्टिक पिशवी जप्तीची धडक कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : परिसरातील दूध बाजार ते फाळके रोड विविध प्रकारच्या व्यावसायिकांवर प्लास्टिक पिशवी जप्तीची धडक कारवाई करण्यात आली. यात पथकाने दहा किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करत सुमारे २५ हजारांचा दंड महापालिका पूर्व विभागाच्या घनकचरा विभागाच्या पथकाकडून वसूल करण्यात आला. (Action to confiscate plastic bags in city 10 kg of plastic seized)

राज्य सरकारतर्फे प्लास्टिक पिशवी वापरावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. असे असताना व्यवसायिकांकडून प्रतिबंधक प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. अशा प्रकारच्या पिशव्यांचा वापर करू नये. यासंदर्भात पूर्व विभागाच्या घनकचरा विभागाकडून व्यवसायिकांना काही दिवसांपूर्वी नोटिसा देण्यात आल्या होत्या.

नोटीसचे उल्लंघन करत व्यवसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू ठेवला आहे. याविरुद्ध विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली दूध बाजार, फुले मार्केट, फाळके रोड अशा विविध भागातील सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांवर प्लास्टिक पिशवी जप्त आणि दंडात्मक कारवाई केली.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यवसायिकांकडून सुमारे १० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे २५ आजारांचा दंड वसूल केला. अचानक झालेल्या कारवाईने व्यवसायिकांची तारांबळ उडाली. प्लास्टिक पिशव्या लपविण्यासाठी त्यांची धावपळ उडाली. पथकाने मात्र कारवाई सुरू ठेवली. (latest marathi news)

महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जात असताना काही व्यावसायिकांनी विरोध केला. आमच्यावर कारवाई करण्यापेक्षा प्लास्टिक पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा. त्यांच्याकडून पिशव्या तयार करण्यात आल्या नाही तर बाजारात पिशव्या येणारच नाही. असे प्रश्न उपस्थित करत पथकाशी वाद घालण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांशी हुज्जत

दरम्यान पोलिसांनी रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या दूध विक्रेत्यास त्याचे वाहन बाजूला करण्याचे सांगितल्याचा राग आला. त्याने प्लास्टिक जप्ती कारवाईचा राग पोलिस कर्मचाऱ्यावर काढला. त्यांच्याशी वाद घालत गैरवर्तन केले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इतर व्यावसायिकांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. यापुढेही अशाच प्रकारे धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सातपूरला कारवाई

येथील भाजी मंडई मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर व विक्री केला जात असल्याने पथकाने प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. बुधवारी (ता.३१) दुपारी साडेबाराला ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी ही कारवाई करत असताना मारुती व्हॅन चालकाने माहिती देताना उडवाउडवीचे उत्तरे दिली. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कायद्यानुसार त्याला पाच हजार रुपयांची शिक्षा करून गाडीमधील प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. आरोग्य अधिकारी संजय गोसावी, विजय सपकाळे, नरेश नुनसे, विजय पवार, चिंतामण पवार यांनी ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT