Addiction in Youth esakal
नाशिक

Addiction in Youth : सेलिब्रेशन ट्रेंडमुळे तरुणाईत व्यसनाधिनता! पालकांनी सतर्क राहिल्यास बसेल चाप

Nashik News : या आनंदाची दुसरी बाजू म्हणजे या सेलिब्रेशनच्या नावाखाली चालणारी व्यसनाधीनता, चुकीच्या गोष्टींचा पायंडा, पाश्‍चिमात्यांचे अंधानुकरण यामुळे तरुणाई भरकटत चालली आहे.

मनोहर शेवाळे

जायखेडा : सध्या आधुनिक जीवनशैलीमध्ये विविध डेज, सेलिब्रेशनचा ट्रेंड वाढत आहे. थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन व नववर्षाचे स्वागतही जल्लोषात केले जाते. आयुष्यातील महत्वाच्या क्षणांना इव्हेंटचे स्वरूप येत आहे. मात्र, या आनंदाची दुसरी बाजू म्हणजे या सेलिब्रेशनच्या नावाखाली चालणारी व्यसनाधीनता, चुकीच्या गोष्टींचा पायंडा, पाश्‍चिमात्यांचे अंधानुकरण यामुळे तरुणाई भरकटत चालली आहे. व्यसनांच्या गर्तेत अडकून, तर कधी बेजबाबदारपणे वाहने चालवून होणाऱ्या अपघातांमध्ये आयुष्याचा शेवट होत असल्याचे दाहक वास्तव्य समोर येत आहे. (Nashik Addiction in youth due to celebration trend)

विज्ञान संशोधनामुळे आजचे युग टेक्नोसेव्ही बनले आहे. स्मार्टफोनबरोबर तरुणाई स्मार्ट बनली असून, हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. माहितीचे महाजाल निर्माण झाल्याने जग जवळ आले आहे. त्याबरोबरच पाश्‍चिमात्य संस्कृतीचा शिरकाव झाला असून, सेलिब्रेशनचा ट्रेंड वाढला आहे. क्षुल्लक कारणांसाठी देखील सेलिब्रेशन केले जात आहे.

यामध्ये तरुणाईची संख्या जास्त आहे. अशा सेलिब्रेशनमध्ये मद्याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने अनेकजण व्यसनामध्ये गुरफटत आहेत. व्यसनांच्या आहारी जाऊन तरुणांकडून चुकीचे पावले उचलले जात आहेत. सामाजिक सभ्यता कमी होत असून, अश्‍लिलता व बीभत्सतेचे दर्शन होत आहे.

मद्यासह विविध नशा केल्या जात आहे. नशेची झिंग चढल्यावर बेजबाबदारपणे वाहने चालवली जात असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढत असून, तरुणांचा बळी जात आहे. ऐन तारुण्यात जीवाला मुकावे लागत आहे. त्यामुळे पालकांनीही सतर्क राहून आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. (latest marathi news)

सोशल मीडियाचा अतिरेक जीवघेणा

हल्लीच्या पिढीकडून सोशल मीडियाच्या वापराचा अतिरेक वाढत आहे. ज्यामुळे तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात सहजतेने अडकत आहे. कुतूहलासाठी केलेले सर्चिंग पोर्नग्राफीपर्यंत पोहचत आहे. व्यसनाधीनतेमुळे मनस्थिती दुभंगत आहे. धैर्य, सकारात्मकता हरवली असून, क्षुल्लक कारणाने तरुणांकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे.

"सध्या विविध सेलिब्रेशनच्या नावाखाली तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. व्यसनामुळे तरुण मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळत असून, भविष्याच्या दृष्टीने हे घातक आहे. पालकांनीही गांभीर्याने या गोष्टीकडे बघितले पाहिजे."

- पुरुषोत्तम शिरसाठ, पोलिस निरीक्षक, जायखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT